Friday, May 3, 2024
घरमानिनीनववर नव्हे तर चक्क 'या' जमातीतील वडिलच करतात लेकीशी लग्न

नववर नव्हे तर चक्क ‘या’ जमातीतील वडिलच करतात लेकीशी लग्न

Subscribe

जगात विविध जातीजमातीचे लोक राहतात. त्यापैकी काही जमाती या अतिशय भयंकर असतात आणि ते सामान्य लोकांशी कनेक्टच होऊ शकत नाहीत. तर काही जमाती या आपल्या परंपरांमुळे फार चर्चेत येतात. अशातच आम्ही तुम्हाला अशा एका जमाती बद्दल सांगणार आहोत जेथे एक वडिल चक्क आपल्या पोटच्या मुलगीशी लग्न करतात. जी मुलगी बालपणी त्यांना वडिल असे म्हणते तिच तरुण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यानंतर तिला त्यांनाच नवऱ्याच्या रुपात स्विकार करते.

ही विचित्र परंपरा बांग्लादेशातील एका जमातीद्वारे केली जाते. याबद्दल ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत. ही प्रथा खरंतर मंडी जमाती मधील असून ती परंपरांगत चालत आलेली आहे. ज्यांनी कोणीही याबद्दल ऐकले नसेल ते याला कुप्रथा असल्याचे म्हणतात.

- Advertisement -

या प्रथेच्या मते, एक वडिल जे बालपणापासून आपल्या मुलीला लाडाने मोठी करतात पण त्यानंतर ती जेव्हा तारुण्यात येते तेव्हा तेच तिच्याशी लग्न करतात. खरंतर या जमातीतील पुरुष जेव्हा एका विधवेशी लग्न करतो तेव्हा तिच्या मुलीशी हा पुरुष ती तरुण झाल्यानंतर लग्न करु शकतो. या जमातीतील पुरुष मंडळी विधवा महिलांशी या अटीवर लग्न करतात की, तिच्या मुलीशी ती मोठी झाल्यानंतर लग्न करु शकतील. या अटीवर जर ती महिला मान्य झाल्यास तरच पुरुष तिच्याशी लग्न करतो. या संपूर्ण प्रथेत त्या विधवा महिलेच्या मुलीचेच नुकसान होते.

दरम्यान, ही कुप्रथा काही वर्षांपांसून सुरु आहे. या प्रथेनुसार मुलगी ही सावत्र असणे अनिवार्य आहे आणि हा पुरुष आपल्या मुलीशी लग्न करु शकत नाही. अशा प्रकारचे लग्न तेव्हाच होते जेव्हा एखादी महिला कमी वयात विधवा झाली असेल आणि तिची कोणतीही मुलगी नाही.

- Advertisement -

या जमातीतील लोक या कुप्रथेमागील असे कारण सांगतात की, ज्या विधवेशी ते लग्न करत आहेत त्यांचे वय कमी आहे. याच कारणास्तव महिलेसह तिच्या मुलीची आयुष्यभर काळजी घेता येईल. पण यामध्ये मुलींचे आयुष्य उद्धस्त होत आहे.

 


हे देखील वाचा: वाढत्या वयासह लग्नासाठी स्थळ येत नाहीये? करा हे उपाय

- Advertisment -

Manini