घरदेश-विदेशKangana Ranaut : कंगना रणौतबाबत अपमानास्पद टिप्पणी; महिला आयोगाने घेतली दखल

Kangana Ranaut : कंगना रणौतबाबत अपमानास्पद टिप्पणी; महिला आयोगाने घेतली दखल

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघाच्या भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुप्रिया श्रीनेत आणि एचएस अहिर यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजपा आक्रमक झाला असून संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे.

निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून श्रीनेत आणि अहिर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाने यासंदर्भात एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली आहे. सुप्रिया श्रीनेत यांच्या लाजिरवाण्या वर्तनामुळे राष्ट्रीय महिला आयोगाला धक्का बसला आहे. सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियावर कंगना रणौतबद्दल असभ्य आणि अपमानजनक कमेंट केली होती. असे वागणे महिलांच्या प्रतिष्ठेविरुद्ध आहे. रेखा शर्मा यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : वंचितला दिलेला चार जागांचा प्रस्ताव कायम – संजय राऊत

- Advertisement -

सुप्रिया श्रीनेत यांचे स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर श्रीनेत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटचा ऍक्सेस अनेकांकडे आहे. त्यापैकी एकाने अत्यंत अयोग्य पोस्ट केली आहे. मला याबद्दल कळताच मी ती पोस्ट डिलीट केली. जे मला ओळखतात त्यांना मी कधीही कोणत्याही महिलेबद्दल वैयक्तिक आणि असभ्य टिप्पणी करू शकत नाही, हे चांगलेच माहित आहे.

कंगना रणौत विरोधात करण्यात आलेल्या अश्लील टिप्पणी संदर्भात काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयोग निवडणूक आयोगाकडे करेल, असे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर सुप्रिया श्रीनेत यांना उत्तर देताना, “प्रत्येक महिला तिच्या सन्मानास पात्र आहे,” असे कंगनाने म्हटले आहे.

हेही वाचा – Politics: सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता…; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

श्रीनेत यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कंगना संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. ही पोस्ट नंतर हटविण्यातही आली. यावर आपल्या अकांउटचा ऍक्सेस दुसऱ्याकडे गेल्याने ही गडबड झाली, असे सुप्रिया श्रीनेत यांचे म्हणणे आहे. थोडक्यात, आपण ही पोस्ट केली नाही, असा दावा श्रीनेत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -