घरराजकारणहे सरकारच असंवेदनशील; महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

हे सरकारच असंवेदनशील; महाराष्ट्र भूषण कार्यक्रमावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Subscribe

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे ईडी सरकारच असंवेदनशील आहे. मग तो कोणताही प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा महिलांचा अपमान असो हे सरकार नेहमीच असंवेदनशील राहिलं आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे ईडी सरकारच असंवेदनशील आहे. मग तो कोणताही प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा महिलांचा अपमान असो हे सरकार नेहमीच असंवेदनशील राहिलं आहे.

अनेक ठिकाणी गारपीट झाली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले परंतु आम्ही प्रशासनाला माहिती दिली आहे, असं सांगितलं जात आहे. परंतु शेतकऱ्यांना मात्र कोणतीही मदत करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे. त्याला आधाराची गरज असल्याचे, सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. ( This government is insensitive NCP leader Supriya Sule s reaction on Maharashtra Bhushan programme )

- Advertisement -

महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात उष्माघातामुळे 12 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. हा महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्देवी तसचं काळा दिवस असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

युनिटच तयार करा, सुप्रिया सुळेंनी माध्यमांना दिली आयडिया

अजित पवार नाराज आहेत का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना एक आयडिया दिली. त्या हसत म्हणाल्या की कालच मी तुमच्या माध्यमातून अजित पवार यांना नागपुरच्या सभेत पाहिलं. कधी कधी एखादा कार्यक्रम रद्द होतो. त्यात नाराज आहेत वगैरे असं काही नाही, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

- Advertisement -

( हेही वाचा: रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का, उपनगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर )

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी आलेल्या ११ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. सांस्कृतिक विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांचा खरा आकडा लपवला जात आहे. प्रशासनाने आणि रुग्णालयाने नागरिकांसमोर खरी माहिती द्यावी. मुळात या कार्यक्रमाची सर्व जबाबदारी राज्य शासनाची होती. त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, असं दानवे यावेळी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -