Thursday, May 2, 2024
घरमानिनीRelationshipसासूची बोलणी ऐकून राग येतोय, मग शांततेत द्या असे उत्तर

सासूची बोलणी ऐकून राग येतोय, मग शांततेत द्या असे उत्तर

Subscribe

लग्नानंतर सासरी जमवून घेणे प्रत्येक तरुणीला आव्हानात्मक वाटते. खासकरुन सासू सोबतचे नाते टिकवणे फार सोप्पे नसते. कारण काही वेळेस सासू मुलगी म्हणून तिला स्विकारते मात्र तिच्याशी तसे वागत नाही. अशातच लहान मोठ्या गोष्टींमध्ये मतभेद निर्माण झाल्यास तर वाद होतात. सर्वसामान्यपणे सासूला जर एखादी गोष्ट आवडवली नाही तर तिच्या तोंडून असा एखादा शब्द निघतोच ज्यामुळे सुनेला वाईट वाटू शकते.

मात्र प्रत्येक सासू अशीच असते असे नाही. मात्र काही सासू अशा असतात ज्या तुम्हाला त्रास देतात आणि वाईट वाटावे म्हणून काहीही करु शकतात. अशातच तुम्ही त्यांना कसे हॅण्डल करावे याच बद्दलच्या खास टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

सासूच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करा
जी सासू आपल्या सुनेला पसंद करत नाही ती नेहमीच आपल्या सूनेला काही ना काहीतरी बोलून दाखवण्यासाठी कारणे शोधते. ऐवढेच नव्हे तर सुनेच्या माहेरांच्या बाबतीत अपशब्द वापरले जातात. अशातच सुनांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. जर सासू मर्यादा सोडून बोलत असेल तरच तुम्ही त्याचे उत्तर द्या.

- Advertisement -

सासू काही बोलल्यानंतर रिअॅक्ट करु नका
सासू सोबत राहून तुम्हाला कळलेच असेल की, ती नक्की कशी आहे आणि कोणत्या ट्रिक्सने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा काहीच रिअॅक्ट होऊ नका. वेळ आल्यानंतर योग्य ते उत्तर द्या.

सासूच्या टोमण्यांवर उत्तर देऊ नका
सासूने जरी टोमणे मारले तरीही त्याचे उत्तर देऊ नका. कारण असे केल्यानंतर तुम्ही रागात काही बोलून गेलात तर वाद अधिक वाढला जाईल. त्यामुळे आधी शांत व्हा आणि नंतरच उत्तर द्या.

सासूला प्रेमाने उत्तर द्या
सासूला तिचे उत्तर प्रेमाने द्या. जरी सासू तुम्हाला चार-चौघांमध्ये काही बोलली तर आधी ऐकून घ्या आणि तेथेच सर्वांसमोर प्रेमाने उत्तर द्या.


हेही वाचा- वहिनीसोबतचे नाते नणंदेला ‘या’ कारणांस्तव वाटते insecure

- Advertisment -

Manini