घरताज्या घडामोडीविरोधी पक्षनेता घोषित का झाला नाही? सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले भिडले

विरोधी पक्षनेता घोषित का झाला नाही? सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले भिडले

Subscribe

राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. तीन आठड्यांपैकी दोन आठवड्यांचा कालावधी आज पूर्ण होणार आहे. परंतु अद्यापही विधानसभेत विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्षनेता घोषित का झाला नाही? असा सवाल भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वेळी उपस्थित केला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकहितकारी निर्णय घोषित केल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी ज्यापद्धतीने वक्तव्य केलं. त्याचा सभागृहाने निषेध केला पाहिजे. शेतकरी संकटात असल्यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घोषित करतात. त्यामुळे इतक्या खोट्या मनाने कुणीही वागता कामा नये. शेतकऱ्यांना मदत करू नये, असा भाव यांच्या वक्तव्यातून निर्माण होतो, असं आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

विरोधी पक्षनेता आजपर्यंत घोषित का करण्यात आला नाही, हे मला जाणून घ्यायचं आहे. हा माझाही जाणून घ्यायचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. विरोधी पक्षनेता घोषित न करता सरकारवर अशा पद्धतीने त्यांच्या निर्णयाला विरोध करणं, हा लोकशाहीच्या धोक्याचा घंटा आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखून घेण्याची आवश्यकता आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. नाना पटोले म्हणाले की, मुनगंटीवार यांनी विरोधी पक्ष नेत्याची निवड का करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित केला. माझा मुद्दा असा आहे की, सहा जिल्ह्यांमध्ये एकच मंत्री पालकमंत्री आहे. या राज्यामध्ये हे काय चाललं आहे. अवकाळी पावसामुळे आमचा पालकमंत्री पोहोचू शकला नाही. आताची महाराष्ट्रातील परिस्थिती प्रचंड भयानक आहे. अशा परिस्थितीत यांना आरोप करण्याचं काय कारण आहे. हे राज्य सरकारने सांगावं, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : इंजिन कोणाला ढकलतंय हे महाराष्ट्र बघतोय, बाळासाहेब थोरातांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -