Saturday, April 13, 2024
घरमानिनीHealthछंद जोपासल्याने सुधारते मानसिक आरोग्य

छंद जोपासल्याने सुधारते मानसिक आरोग्य

Subscribe

कोणतेही आवडीचे काम आणि छंद आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करतात. एका संशोधानुसार, हे सिद्ध झाले आहे. आजच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे लोक इतके बिझी झालेत की, त्यांना स्वतःच्या छंदासाठी वेळ देता येत नाही. परिणामी, अनेकजण कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. चुकीची लाइफस्टाइल आणि जास्त कामामुळे चिंता, स्ट्रेस आणि डिप्रेशनसारख्या समस्या वाढत आहेत. जाणून घेऊयात, छंद आपल्या मानसिक आरोग्यावर कसे परिणामकारक ठरतात.

स्ट्रेस – प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा छंद असायलाच हवा. आपल्या आवडीचे काहीतरी केल्याने स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते. खरं तर , छंदांमध्ये सहसा अनेकजणांचे चित्रकला, डान्स किंवा गाणे यापैकी छंद असतात. जेव्हा तुम्ही स्ट्रेसखाली असता तेव्हा तुम्ही असे काही तुमचे छंद जोपसलेत तर मनातील गडबड थांबते आणि मन शांत होते. अशा प्रकारे, स्ट्रेसची पातळी कमी होण्यासाठी छंद फायदेशीर ठरतात.

- Advertisement -

सोशल कनेक्शन वाढते – जेव्हा तुम्ही तुमच्या छंदासाठी वेळ देता तेव्हा तुम्हाला तुमच्यासारखेच छंद जोपासणारे लोकांना भेटायला आवडते. अशा प्रकारे तुमचे सोशल कनेक्शन वाढत जाते. सोशल कनेक्शनमुळे तुम्ही अशा लोकांसोबत तुमच्या भावना मोकळेपणाने शेअर करू लागता अशाने तुमचे मन हलके राहते. तज्ज्ञांच्या मते, जे लोक आपले विचार इतरांसोबत शेअर करतात, त्यांचा स्ट्रेस कमी होतो. अशा लोकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असते जे आपले विचार मनात दडवून ठेवत नाही.

डिप्रेशन आणि चिंता कमी होते – छंद जोपासल्याने स्ट्रेस तर कमी होतोच शिवाय डिप्रेशनमध्येही घट होते. एका अहवालानुसार, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी मानसिक आरोग्य विकाराचा बळी ठरतो. त्याचवेळी, जर तुम्ही नियमितपणे तुमच्या आवडीचे काहीतरी करत असाल जसे की, लेखन , डान्स किंवा आवडीचे कोणतेही काम करत असाल तर ते डिप्रेशन किंवा चिंता यांना सामोरे जाण्यास मदत करते.

- Advertisement -

मानसिक आरोग्य सुधारते – छंदाच्या मदतीने तुम्ही स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशनसारख्या समस्यांना तोंड द्यायला शिकता. त्याचप्रमाणे छंद जोपसल्याने मानसिक आरोग्यही सुधारते. म्हणजेच तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहू लागता.

Multiracial romantic young couple dancing together in kitchen at home Stock Photo by Wavebreakmedia

संबंध सुधारतात – छंदाच्या मदतीने तुमचे नातेही सुधारू शकते. खरं तर, जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत, त्याच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेता तेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता. अशा प्रकारे छंद तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक पद्धतीने परिणाम करतेच शिवाय तुमचे नातेही सुधारते.

 

 

 


हेही वाचा : jumping jacks benefits : जंपिंग जॅकचे हे आहेत फायदे

 

- Advertisment -

Manini