Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthमानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते आर्ट थेरपी

मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते आर्ट थेरपी

Subscribe

आजकालच्या बदललेल्या लाइफस्टाइमुळे सर्वजण मानसिक आरोग्य बिघडण्याच्या समस्येचा सामना करतात. गरजेचे नाही की, व्यक्ती शारीरिक रुपात आजारी असतो. तो एखाद्या स्थिती किंवा भावनात्मक तणावामुळे सुद्धा नैराश्याचा सामना करत असतो. त्यामुळे आपल्या लाइफस्टाइलमध्ये थोडा बदल केल्याने मानसिक ताणापासून दूर राहण्यास मदत होते. अशातच आर्ट थेरपी तुम्हाला मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.

आर्ट थेरपी ही एक प्रकारची मनोवैद्यकीय स्थिती असून त्यात भावना आणि अनुभव मोकळेपणाने सांगण्यास मदत होते. त्यामुळे आपल्यातील भावना या आर्टच्या माध्यमातून रेखाटणे यालाच आर्ट थेरपी असे म्हटले जाते. आर्ट थेरपीमध्ये कोलाज मेकिंग, ड्रॉइंग, कलरिंग, स्केचिंग, फिगर पेंन्टिंग,फोटोग्रापी, स्क्रिप्टिंग, क्ले वर्क अशा काही अॅक्टिव्हिटी केल्या जातात.

- Advertisement -

The Role of Art Therapy in Addiction Recovery | INTEGRIS Health

आर्ट थेरपीचे फायदे
-सेल्फ मॅनेजमेंट सुधारते
स्वत:वरील ताबा सुटल्यास एखाद्या गोष्टीचे अॅडिक्शन लागू शतचे. अशातच लोकांनी आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल केला पाहिजे. आर्ट थेरपीमुळे लक्ष केंद्रित करणे, शिस्तीत वागणे आणि हेल्थी आयुष्य जगण्यास मदत करते.

- Advertisement -

-पास्ट ट्रॉमातून बाहेर येण्यास मदत होते
बहुतांश लोक आपल्या भूतकाळातील गोष्टींमुळे सतत नैराश्यात असतात. अशी स्थिती दीर्घकाळ राहिली तर मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. नव्या गोष्टी समजून घेणे किंवा शिकण्यास ही समस्या उद्भवू शकते. अशातच तुम्ही आर्ट थेरपीची मदत घेऊ शकता. आर्ट थेरपी तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास भाग पाडते. तुमचे नकारात्मक विचार दूर करण्यास मदत करते. वर्तमानकाळातील गोष्टी एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यास ही मदत होते.

-समस्या सोडवण्याचे स्किल्स डेव्हलप होतात
आर्ट थेरपीमुळे तुम्हाला एखादी समस्या सोडवण्यासाठी कसा मार्ग शोधायचा यासाठी मदत होते. सध्याच्या तरुणांमध्ये एंग्जायटी आणि नैराश्याची स्थिती फार आढळून येते. अशातच बदलत्या जीवनशैलीत संतुलित राखणे फार महत्त्वाचे असते. आर्ट थेरपी यावेळी मदत करू शकते. वर्तमानकाळातील गोष्टींशी तुम्ही जोडले जाता आणि सकारात्मक विचार करू शकता.


हेही वाचा- मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर इको थेरेपी

- Advertisment -

Manini