घरमहाराष्ट्रSanjay Raut : आम्ही काय बोलतो हे काँग्रेसला कळत नाही, राऊतांचा नाना...

Sanjay Raut : आम्ही काय बोलतो हे काँग्रेसला कळत नाही, राऊतांचा नाना पटोलेंना टोला

Subscribe

खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन्ही नेते कायमच एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार? या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी असली तरी या आघाडीमध्ये बिघाडी असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन्ही नेते कायमच एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार? या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे. (Sanjay Raut response to Nana Patole’s criticism)

इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे हे देखील पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ज्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नका, असे नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले. ज्यानंतर आता त्यांच्या या विधानाला खासदार संजय राऊत यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आम्हाला नेमके काय बोलायचे आहे, हे काँग्रेसला कळत नाही आणि त्यामुळे नाना पटोलेंच्या बोलण्याकडे लक्ष देणे गरजेचे नाही, असे प्रत्युत्तर राऊतांकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

आज रविवारी (ता. 21 एप्रिल) पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. लोकही त्यांना पसंत करतात. त्यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत त्यांच्या नावाला पंतप्रधान पदासाठी दुजोरा मिळू शकतो. पण इंडियामध्ये इतरही अनेक चेहरे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला जर का ती संधी मिळाली तर त्याचे आम्ही स्वागतच करू. पण इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. इतरही अनेक पक्ष आहेत, जे आपापल्या राज्यात निवडणूक लढत आहेत. त्यामुळे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न नाही, तर हुकूमशाहीला पराभूत करणे, हे मोठे आव्हान असल्याचे राऊतांकडून यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : हिंगोलीच्या सभेतून दानवेंचा मोदी-शहांवर घणाघाती हल्ला, म्हणाले…

- Advertisement -

तसेच, भाजपाकडे केवळ एकच चेहरा आहे, जो गेल्या 10 वर्षांपासून नेतृत्व करत आहे. त्यामुळे लोक आता त्यांना स्वीकारणार नाही. मोदी आणि त्यांचा पक्ष वाईटरीत्या पराभूत होणार आहे. त्यामुळे आता प्रश्न आहे की इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा कोण? तर इंडियाकडे अनेक प्रमुख चेहरे आहेत. अनेक नेतृत्व आहेत. त्यातील उद्धव ठाकरे हे एक प्रमुख नेतृत्व आहेत, असेही संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इंडिया आघाडी झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी हे इंडियाचा चेहरा असल्याचे सांगत होते. पण आता त्यांनी उद्धव ठाकरे देखील इंडियाचे नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे म्हणत आहेत. यावरून राऊतांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नका, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सांगण्यात आले. यावरून आता राऊतांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिले असून प्रसार माध्यमांसमोर ते म्हणाले की, नाना पटोलेंच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देऊ नका, राहुल गांधी यांच्यासोबत आमचे चांगले नाते, असेही राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha : संविधान आणि देश वाचवायचा असेल तर भाजपाला रोखावं लागेल; आदित्य ठाकरेंचे आवाहन

तर, हे भांडण पंतप्रधानपदासाठीचे नाही. आम्ही काय बोलत आहोत, हे काँग्रेसच्या नेत्यांना कळत नाहीये. राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत. जर का त्यांना पंतप्रधान बनायचे असेल तर त्याचेही स्वागत आहे. त्यांच्याऐवजीही अनेक पंतप्रधानपदाचे चेहरे इंडिया आघाडीत होते. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव हे देखील पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. कोणाचे नाव घेणे गुन्हा आहे का? जर आम्ही आमच्या पक्षाच्या नेत्याचे नाव घेत असू तर त्यात चुकीचे काय? असा प्रश्नही यावेळी खासदार संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -