Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन ‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर डंका; 200 कोटींचा टप्पा पार

‘द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर डंका; 200 कोटींचा टप्पा पार

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास 18 दिवस झाले असून केरळ स्टोरी प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटापेक्षा उत्तम कमाई करताना दिसत आहेत.

‘द केरळ स्टोरी’ने केला 200 कोटीचा टप्पा पार

या चित्रपटाने विकेंडला 35.49 कोटी कमावले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात ‘द केरळ स्टोरी’चे कलेक्शन 81.14 कोटी इतके होते. या चित्रपटाने 16व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 9.15 कोटींची कमाई केली आहे. तसेच 17व्या दिवशी 11 कोटी कमावले होते तर 18 व्या दिवशी या चित्रपटाने 5.50 कोटी कमावले आहेत. आत्तापर्यंत एकूण या चित्रपटाने 204 कोटी कमावले आहेत. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आता 200 कोटीचा टप्पा सहज पार केला आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

- Advertisement -

‘द केरळ स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे ज्यांचे धर्मांतर करण्यासाठी दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. जमियत उलेमा-ए-हिंदनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

- Advertisement -

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता.

 


हेही वाचा :

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना गंभीर दुखापत

- Advertisment -