Wednesday, May 1, 2024
घरमानिनीHealthपिरियड लिकेज टाळण्यासाठी वापरा 'या' टीप्स

पिरियड लिकेज टाळण्यासाठी वापरा ‘या’ टीप्स

Subscribe

प्रत्येक महिन्याला महिलेला पीरियड सायकलमधून जावे लागते. पीरियड्स दरम्यान महिलांना आणखी काही समस्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. पीरियड्स येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही काही महिलांना यावेळी खुप त्रास होतो. याच दरम्यान महिलांना पॅड लीकेजची ही भीती वाटत रहाते. (Pad leakage problem)

घरातून निघाल्यानंतर, शाळा, ऑफिस किंवा कॉलेज अशा प्रत्येक ठिकाणी पीरियड्स आल्यानंतर मनात एक वेगळीच भीती असते की, कुठे डाग तर लागणार नाही ना? हेवी फ्लो मुळे काही वेळा पॅडमधून ब्लड लीक होते आणि कपड्यांना रक्ताचे डाग लागतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला पॅड लीकेजच्या समस्येपासून कसे दूर रहावे याच बद्दलच्या काही टीप्स सांगणार आहोत.

- Advertisement -

योग्य पद्धतीने लावा पॅड
जर तुम्ही योग्य पद्धतीने पॅड लावला नाही तर यामुळे लीकेजची समस्या होऊ शकते. अशातच सर्वात प्रथम स्टेप म्हणजे पॅड व्यवस्थितीत लावणे. पॅडला पँन्टीच्या मध्ये व्यवस्थितीत लावावे. आजकाल बहुतांश महिला क्लोथ पॅडचा वापर करतात. या पॅडमधून ब्लड कमी अॅजॉर्ब केले जाते. त्यामुळे अशा पॅड्स पासून दूर रहावे.

- Advertisement -

विंग्स पॅडचा वापर करा
पॅड लीकेजच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही नॉर्मल पॅडऐवजी विंग्स पॅडचा वापर करा. याचा वापर करुन सुद्धा तुम्ही लीकेजपासून दूर राहू शकता. विंग्स पॅड्स मूव करत नाही. ज्यामुळे ते लीकेज होत नाही. ते तुमच्या पँन्टीला व्यवस्थितीत स्टिक होतात. अल्ट्रा विंग्स असणारे पॅड लिक्विड जेलमध्ये सुद्धा येतात. यामुळे लीकेजची समस्याच येत नाही.

पँन्टी लाइनरचा वापर करा
जर काम आणि अभ्यासाठी दिवसभर घराबाहेर रहणाऱ्या महिलांना पॅड लीकेज होण्याची भीती असते. अशातच तुम्ही या समस्येपासून दूर राहण्यासाठी पँन्टी लाइनरचा वापर केला पाहिजे. पँन्टीलाइनर पॅडच्या साइडवेज आणि पॅडच्या खाली लावून तुम्ही लीकेजपासून दूर राहू शकता.(Pad leakage problem)

थिकर अंडरवियर घाला
पीरियड्स दरम्यान तुम्ही थिकर अंडरवियर घाला. यामुळे लीकेजची समस्या होत नाही. डाग लागण्याची भीती सुद्धा कमी होते. या व्यतिरिक्त ते खुप कंफर्टेबल ही असतात. अंडरवियर जर सैल असेल तर लीकेजची समस्या उद्भवू शकते.

मेंस्ट्रुअल कपचा वापर करा
हे एक रियुजेबल प्रोडक्ट आहे. हा कप सिलिकॉन आणि रबर पासून तयार केला जातो. तो अगदी सुरक्षिततही आहे. मेंस्ट्रुअल कप प्रत्येक 6-12 तासांनी रिकामा करावा लागतो. याचा वापरामुळे सुद्धा तु्म्ही लीकेजच्या समस्येपासून दूर राहू शकता. याचा वापर करणे ही अगदी सोप्पे आहे.


हेही वाचा- Period Panty चा वापर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

- Advertisment -

Manini