घरताज्या घडामोडीTrain Accident : ओडिशात 51 तासानंतर गाडी सुटली, पण लगेच दुसरा अपघात,...

Train Accident : ओडिशात 51 तासानंतर गाडी सुटली, पण लगेच दुसरा अपघात, मालगाडीचे 5 डबे घसरले

Subscribe

ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेला दोन दिवस पूर्ण झाले आहेत. तब्बल 51 तासानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. परंतु या घटनेतून लोक सावरतच नाहीत तोवर आणखीन एका रेल्वेचा अपघात ओडिशात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारगढ जिल्ह्यातील मेंधापाली या ठिकाणी मालगाडीला अपघात झाला असून पाच डबे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.

इस्ट कोस्ट रेल्वेने या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बारगढ जिल्ह्यातल्या मेंधापालीजवळ एका सिमेंट फॅक्ट्रीकडून चालवण्यात येणाऱ्या मालगाडीचे काही डबे फॅक्ट्री परिसरात रुळावरून घसरले. एक खासगी सिमेंट कंपनीचा ट्रेन ट्रॅक आहे. कंपनीचा रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅकही आहे. या अपघातावर बोलताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही मालगाडी एक खासगी सिमेंट कंपनी चालवत होती. ते नॅरोगेज साइडिंगवर चालत होते.

- Advertisement -

तब्बल दोन दिनसांनी अपघातग्रस्त परिसरातून ट्रेन रवाना झाली आहे. या ट्रेनचा व्हिडीओही आता समोर आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या व्हिडीओमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. बयाना रेल्वे स्थानकावरुन ट्रेन रवाना होताच अश्विनी वैष्णव यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना हस्तांदोलन केले आणि त्यानंतर ट्रेनकडे पाहुन हात जोडत प्रार्थना केल्याचे दिसत आहे. प्रार्थना करताना अश्विनी वैष्णव यावेळी काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

- Advertisement -

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेन रवाना होताना दिसत आहे. यानंतर रेल्वेमंत्री ‘भारत माता की जय‘ आणि ‘वंदे मातरम‘ अशा घोषणा देताना दिसत आहेत. त्यानंतर ते याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आभार मानताना दिसत आहेत. रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट करताना म्हटले की, अपघातग्रस्त डाऊन लाईन सुरू करण्यात आली आहे. या परिसरातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे. यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट करत अप–लाईनवरही ट्रेनची वाहतूक सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

शुक्रवारी ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1100 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 187 मृतदेहांची ओळख पटलेली नाही.


हेही वाचा : Odisha Train Accident: भीषण अपघाताच्या 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांकडून हात जोडून प्रार्थना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -