Friday, May 17, 2024
घरमानिनीHealth'हे' आजार असलेल्या व्यक्तींनी लसूण खाणं टाळावं

‘हे’ आजार असलेल्या व्यक्तींनी लसूण खाणं टाळावं

Subscribe

आयुर्वेदामध्ये लसूण औषधी मानला जातो. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या नियमित आहारात याचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून सुटका होण्यास मदत होते. काहीजण लसूण कच्चा खातात तर कोणी भाजीत, चटणी अशा विविध पदार्थांद्वारे खातात. कोणत्याही पदार्थात लसूण घातल्यावर पदार्थाची चव वेगळीच लागते. लसणाचा वापर पचनासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यसाठी श्रेष्ठ मानले जातात.

Is Sprouted Garlic Safe to Eat?

- Advertisement -

लसणाची मूळ चव तिखट आहे. पण लसणात सहा रसाचा समावेश आहे. लसणीचे मूळ तिखट, पाने कडू, देठ खारट, नाळ तुरट तर बी गोड चवीची असते. यामध्ये फक्त आंबट रस नाही. लसूण खाण्याचे जेवढे फायदे आहे तेवढेच तोटे देखील आहे. त्यामुळे आज आपण कोणत्या व्यक्तींनी लसूण खावू नये हे जाणून घेणार आहोत.

‘या’ व्यक्तींनी कधीही खाऊ नये लसूण

Raw Garlic Benefits and Side Effects for Your Health | Well+Good

- Advertisement -
  • पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी लसूण खाणं टाळावं.
  • गरोदर स्त्रियांनी देखील लसूण खाऊ नये.
  • नाक आणि तोंडातून रक्त येत असणाऱ्यांना लसणाचे सेवन करू नये.
  • ज्यांना गरम पदार्थ सहन होत नाही त्यांनी देखील विचार करून लसूणाचे सेवन करावे. कारण लसूण ही उष्ण असते.

5 Benefits of eating garlic on an empty stomach | Food & Home Magazine

  • तसेच ज्यांना पोटाचे विकार, अतिसार, अॅलर्जी आहे अशांनी देखील लसणाचे सेवन करू नये.
  • लो ब्लडप्रेशन असणाऱ्या व्यक्तींनी देखील लसूण खाऊ नये.
  • लसूण खाल्ल्यामुळे रक्त पातळ होते. त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरुवातीच्या काही दिवसात लसूण खाणे टाळावे.

हेही वाचा :

मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न खाणं योग्य की अयोग्य?

- Advertisment -

Manini