Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Post Pregnancy नंतर वाढलेले वजन असे करा नियंत्रित

Post Pregnancy नंतर वाढलेले वजन असे करा नियंत्रित

Subscribe

प्रग्नेंसीमध्ये जर एखाद्या महिलेने आपल्या वाढत्या वजनावर लक्ष दिले नाही तर त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतोच. पण प्रेग्नेंसेवेळी महिलेचे वजन किती असावे याबद्दल ही डॉक्टरांकडून सांगितले जाते. परंतु काही महिला असे करतात की, एखादा जी गोष्ट तुम्हाला प्रेग्नेंसी दरम्यान सांगतो तेच ती खाते आणि दिवसभर आराम करते. अशातच वजन वाढू शकते. खरंतर प्रेग्नेंसीनंतर महिलेचे वजन जवळजवळ ५-६ किलोंनी कमी होते. कारण या दरम्यान महिलेच्या पोटातील बाळ आणि एम्नियोटिक फ्लूइड निघून जाते. पण पोस्ट प्रेग्नेंसीनंतर अधिक खाणं-पिणं होत असल्याने सहज वजन वाढू शकते. जर तुम्हाला डिलिवरी नंतर वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर तुम्ही पुढील काही टीप्स जरुर वापरा.

-रियलिस्टिक गोल तयार करा

- Advertisement -


हेल्थलाइननुसार महिलांनी एक रियलिस्ट गोल निर्धारित केला पाहिजे. उगाचच वेगाने किंवा अधिक वजन कमी करण्याच्या नादात महिला एकाच महिन्यात १० किलो वजन कमी करण्याचे टार्गेट ठेवतात. परंतु हे वास्तवात खरं होणं सहज शक्य नसते. डिलिवरी नंतर फॅट अधिक लवकर कमी होत नाही. त्यामुळेच रियलिस्टिक गोल तयार करा आणि त्यानुसार तुमच्या वेट लॉसचा काय प्लॅन असेल हे ठरवा.

-हेल्दी खाण्याला प्राथमिकता द्या

- Advertisement -


डिलिवरी नंतर महिलांना खुप भूक लागते. त्यामुले त्या काहीही खाण्यास सुरुवात करतात. अशातच भूक लागली आहे म्हणून जे काही मिळेल ते खाण्याऐवजी हेल्दी खाण्याला प्राथमिकता द्या. त्याचसोबत दिवसभरात ५०० कॅलरी कमी करु शकता. जेणेकरुन एका आठवड्यात अर्धा किलो तरी वजन कमी केले जाऊ शकते.

-ब्रेस्टफीड गरजेचे


आजकाल बहुतांश महिला सेल्फ डिपेंटेंट असतात. त्या आपल्या ऑफिसच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देता येत नाही. परंतु पोस्ट प्रेग्नेंसीनंतर तुम्ही मुलाला थोडावेळ तरी ब्रेस्टफिडींग करावे. अन्यथा तुमचे वजन वाढू शकते किंवा ब्रेस्ट प्रॉब्लेम सुरु होऊ शकतात. ज्या महिलांना डिलिवरी नंतर वजन कमी करायचे आहे त्यांनी आवश्यक बाळांना स्तनपान करावे.

-आपल्या कॅलरी इंटेककडे लक्ष द्या

 
तुम्ही दिवसभरात काय खाता यावर लक्ष द्यावे. डिलिवरी नंतर महिलांना अधिक कॅलरी आणि एनर्जीची आवश्यकता असते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रतिदिनी जवळजवळ १५०० कॅलरीचे सेवन करु शकता. वजन कमी करण्याासाठी तुम्ही तुमच्या कॅलरी इंटेकवर लक्ष द्या, अधिक कॅलरीज खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते हे लक्षात ठेवा.

-दिवसभर अॅक्टिव्ह रहा


वजन कमी करण्यासाठी महिलांनी आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल केला पाहिजे. यामध्ये सर्वाधिक महत्वाचे म्हणजे दिवसभर अॅक्टिव्ह राहणे. जेवढे तुम्ही स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवाल तेवढेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रत्येक मीलनंतर थोडावेळ शतपावली करा. दरम्यान, पोस्ट प्रेग्नेंसीनंतर शरिरातील उर्जेचा स्तर कमी होतो. अशातच तुम्ही १०-१५ मिनिटे वॉक जरुर करा.


हेही वाचा: महिलांनी तंदुरुस्त राहण्यासाठी करावीत ‘ही’ कामं

- Advertisment -

Manini