घरक्राइमSecurity breach attempt : दिल्लीच्या व्हीआयपी परिसरात आढळल्या एकाच नंबरच्या दोन एसयूव्ही

Security breach attempt : दिल्लीच्या व्हीआयपी परिसरात आढळल्या एकाच नंबरच्या दोन एसयूव्ही

Subscribe

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झालेली असतानाच व्हीआयपी परिसर अशा ओळख असलेल्या राजधानी दिल्लीतील लुटियन्सची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. 18 मार्च रोजी तुघलक रोडच्या उच्च सुरक्षा क्षेत्रात एकाच क्रमांकाच्या दोन एसयूव्ही (SUV) कार ताब्यात घेण्यात आल्या. पोलिसांनी भादंवि कलम 482 आणि 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाहनाचा मालक फरिदाबादचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – Arvind Kejriwal: केजरीवालांना अटकेची भीती; ईडीकडून दंडात्मक कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयात अर्ज

- Advertisement -

व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एकाच क्रमांकाच्या दोन गाड्या दिसताच, त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली होती. 18 मार्च रोजी संध्याकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांना कंट्रोलरुमवर आलेल्या फोनद्वारे संशयास्पद कारची माहिती मिळाली. हाय सिक्युरिटी झोनमधून कॉल आल्यानंतर पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचल्यानंतर दोन्ही गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. सर्वप्रथम वाहनांची तपासणी करून काही संशयास्पद वस्तू आहे का, हे पोलिसांनी पाहिले. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही.

- Advertisement -

तुघलक रोडवर दोन इनोव्हा क्रिस्टा गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. यापैकी एका गाडीचा सिल्व्हर मेटॅलिक रंग होता तर, दुसरी गाडी पांढऱ्या रंगाची होती. दोन्ही वाहनांचा क्रमांक HR-87 J3289 होता. तपासाअंती सिल्व्हर रंगाच्या गाडीचा क्रमांक खरा असल्याचे निष्पन्न झाले तर दुसऱ्या कारच्या चेसीवरील क्रमांक रजिस्ट्रेशनशी जुळला नाही. पांढऱ्या रंगाच्या इनोव्हाचा मूळ क्रमांक HR-38 AD9391 होता.

हेही वाचा – BJP: अमित शहा खरे की फडणवीस; पक्ष फुटीवर भाजपा नेत्यांची वेगवेगळी विधाने

दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. कारण ज्या ठिकाणी या दोन्ही गाड्या आढळल्या, तो परिसर अत्यंत संवेदनशील आहे. काही केंद्रीय मंत्र्यांसह देशातील अनेक व्हीआयपी व्यक्तींची येथे निवासस्थाने आहेत. एका गाडीचा टायर पंक्चर होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अद्याप या गाड्यांवर दावा करण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून ही वाहने येथे कोणी उभी केली होती, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

गाडीची नंबर प्लेट कोणत्या कारणासाठी बदलण्यात आली, याचा शोध पोलीस घेत आहेत. या गाड्यांचा वापर काही गुन्हा करण्यासाठी करण्यात आला होता का? की काही कट रचण्यात आला होता? हे उलगडण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – Jitendra Awhad : सुप्रिया सुळे तर जिजाऊंची लेक, रुपाली चाकणकरांना जितेंद्र आव्हाडांनी सुनावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -