Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : खव्याचे चविष्ट गुलाबजाम

Recipe : खव्याचे चविष्ट गुलाबजाम

Subscribe

गुलाबजाम म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे आज आम्ही हे गुलाबजाम घरच्या घरी कसे करायचे ते सांगणार आहोत.

साहित्य :

  • 250 ग्रॅम खवा
  • 4 चमचे मैदा
  • 2 चमचे रवा
  • 1 मोठी वाटीसाखर
  • 1 मोठी वाटी पाणी
  • वेलची पूड
  • तेल/तूप तळणीसाठी
  • चिमूटभर खाण्याचा सोडा
  • रोज इसेन्स

कृती :

Gulab jamun recipe || kova gulab jamun recipe

- Advertisement -
  • सर्वप्रथम खवा महातानेच मळून घ्यावा आणि त्यामध्ये मैदा, रवा, वेलची पूड मिसळून चांगले मळून एकजीव करावे.
  • गरज वाटल्यास थोडे दूध शिंपडावे.
  • आता तयार मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या करून मंद आचेवर गुलाबी रंगावर तेलात तळून काढावे.
  • नंतर एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये साखर आणि पाणी एकत्र करून पाक करून घ्यावा. साखर विरघळून एक उकळी आली की पाक तयार होईल.
  • आता गँस बंद करून त्यामधे रोज इसेन्स घाला. त्यानंतर तळून घेतलेले गोळे त्या पाकात सोडा हे गुलाबजाम 2-3 तास मुरण्यासाठी ठेवा.
  • 2-3 तासांनी तयार गुलाबजाम सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : सणा सुदीला बनवा मिल्क बर्फी

- Advertisment -

Manini