Tuesday, March 25, 2025
HomeमानिनीRecipeRecipe : सणा सुदीला बनवा मिल्क बर्फी

Recipe : सणा सुदीला बनवा मिल्क बर्फी

Subscribe

सणा सुदीला वेळ मिळत नसल्यामुळे आपण अनेकदा बाहेरुन मिठाई आणतो. पण अनेकदा मिठाईत भेसळ असते. अशावेळी काही मिनिटांत तुम्ही घरीच मिल्क बर्फी बनवू शकता.

साहित्य :

  • 3/4 कप दूध
  • 1/2 कप साखर
  • 4 चमचे तूप
  • केशर
  • 3 कप मिल्क पावडर

कृती :

Easy Milk Barfi Recipe

  • सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध घ्यावे. त्यानंतर त्यात अर्धा कप साखर, तूप, केशर आणि कप मिल्क पावडर घालून एकजीव करुन घ्यावे.
  • हे सर्व मिश्रण एकसारखे परतून घ्यावे.
  • त्यानंतर एका ट्रेला तूप ग्रीस करुन त्यामध्ये मिश्रण घालून चांगले स्प्रेड करुन घ्यावे.
  • त्यानंतर त्यावर पिस्त्याचे काप टाकून 1 तास तसेच ठेऊन द्यावे.
  • नंतर त्याचे काप काढून सर्व्ह करावे.
  • अशाप्रकारे मिल्क बर्फी तयार सणा-सुदीला आवर्जून बनवावी.

हेही वाचा :

Manini