घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : दहा वर्षं काय केले? जाहीरनाम्यावरून जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला...

Lok Sabha 2024 : दहा वर्षं काय केले? जाहीरनाम्यावरून जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला सवाल

Subscribe

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गाधी यांची मोजून केवळ चार छायाचित्रे आहेत. तर भाजपाच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला जेमतेम चार दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आधी काँग्रेसचा आणि त्यानंतर भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. आता त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. याच अनुषंगाने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. (Lok Sabha 2024: Jitendra Ahwad criticizes BJP over manifesto)

भाजपाने काल, रविवारी संकल्पपत्र (जाहीरनामा) प्रसिद्ध केला. या संकल्पपत्रातील माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज, सोमवारी नागपुरात पत्रकार परिषद झाली. काँग्रेसचा जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्ती कधीच होत नसल्याने तो फेल आहे. काँग्रेसचा जाहीरनामा एक कागद आहे. तर, भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे आमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून दोन्ही जाहीरनाम्यांची तुलना करत, भाजपावर टीका केली आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या जाहीरनाम्यातील तुलना करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गाधी यांची मोजून केवळ चार छायाचित्रे आहेत. तर भाजपाच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. शिवाय, प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे म्हटले आहे, मग दहा वर्ष काय केले? असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisement -

दोन्ही पक्षांचे जाहीरनामे बारकाईने वाचले तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. या जाहीरनाम्यांमधील तरुणांचा विभाग पाहिला तर असे दिसते की भाजपाच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांना फक्त पैसे खर्च करायचे आहेत. ते कसे आणि कुठे खर्च करायचे आहेत, याचा कोणताही मुद्देसूद उल्लेख नाही. परंतु काँग्रेसचा जाहीरनामा हा बेरोजगारीचे वास्तव मांडून त्यावर उपाय सुचवणारा, आर्थिक हिशेब देणारा धोरणात्मक आणि महत्त्वाकांक्षी आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसारखा वापर केला; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -