घरताज्या घडामोडीSoundarya Jagdish Death : कन्नड चित्रपट निर्माते सौंदर्य जगदीश यांची आत्महत्या; कारण...

Soundarya Jagdish Death : कन्नड चित्रपट निर्माते सौंदर्य जगदीश यांची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Subscribe

साउथ इंडस्ट्रीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते आणि उद्योगपती सौंदर्य जगदीश यांचा आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मृत्यू झाला आहे. सौंदर्य जगदीश यांनी रविवारी (14 एप्रिल) सकाळी महालक्ष्मी लेआउट, बंगळुरू येथील त्याच्या निवासस्थानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

बंगळुरू : साउथ इंडस्ट्रीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते आणि उद्योगपती सौंदर्य जगदीश यांचा आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मृत्यू झाला आहे. सौंदर्य जगदीश यांनी रविवारी (14 एप्रिल) सकाळी महालक्ष्मी लेआउट, बंगळुरू येथील त्याच्या निवासस्थानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सौंदर्य जगदीश यांनी राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत होते, त्यावेळी त्यांना तात्काळ राजाजीनगर येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 55 वर्षांचे होते. या घटनेमुळे कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. (soundarya jagadish dies after attempting suicide kannada film producer)

मिळालेल्या माहितीनुसार, सौंदर्य जगदीश यांच्या मृत्यू होण्यापूर्वी ते बंद खोलीत बेशुद्ध अवस्थेत होते. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना पाहिलं असता, तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. सौंदर्य जगदीश यांना कोणताही आजार नव्हता. पण त्यांनी आत्महत्या का केली, याच कारण आम्हालाही माहीत नाही. पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत, अशी माहिती सौंदर्य जगदीश यांच्या मित्रांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; बिश्नोईवर संशय

याप्रकरणी महालक्ष्मी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असं म्हटलं जात आहे, यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. सौंदर्य जगदीश यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

बँकेच्या नोटीसमुळे आत्महत्येचा प्रयत्न?

जगदीश यांना नुकतीच बँकेकडून नोटीस आली होती. त्यामुळे या नोटीसमुळे त्यांनी आत्महत्या केली का याचाही तपास केला जात आहे. मात्र, त्या नोटीसचा आणि जयदीश यांच्या आत्महत्येचा काही संबंध नाही. हा प्रश्न काही काळ कायम होता. व्यवसायातील समस्या वेगळ्या आहेत, असे जयदीश यांच्या मित्राने सांगितले. शिवाय, जगदीश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे अहवालही त्यांनी फेटाळून लावला.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास सुरू असून योग्य ती प्रक्रिया केली जाईल. जगदीश यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. आम्ही या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहोत. नुकतंच, त्याच्या सासूचे निधन झाले आणि तो नैराश्यात गेला कारण तो तिच्याशी खूप संलग्न होता. तो डिप्रेशनवर औषधही घेत होता.

सौंदर्य जगदीश यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. कन्नड निर्माता आणि दिग्दर्शक थारुण सुधीर यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट टाकून आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये “सौंदर्य जगदीश सरांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला आणि दु:ख झाले. कन्नड चित्रपटसृष्टीत त्यांची उपस्थिती जाणवेल. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती मनापासून संवेदना”, असे लिहिले आहे.

जगदीश हे चित्रपट निर्माते तसेच, बिल्डर आणि उद्योगपती होते. काही दिवसांपूर्वी त्याचा शहरात एक पब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पब जगदीश यांचा असून काही चित्रपट व्यक्तिमत्त्वांनी आणि क्रूने रात्री उशिरा पार्टी केल्याने वादात सापडला होता. ज्यामुळे त्याचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला होता.


हेही वाचा – Salman Khan News : सलमान खानला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; व्हिडीओ व्हायरल

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -