Monday, April 29, 2024
घरमानिनीनवरा-बायकोमध्ये संवाद कमी झालाय? 'या' टीप्स वापरुन नात्यात आणा गोडवा

नवरा-बायकोमध्ये संवाद कमी झालाय? ‘या’ टीप्स वापरुन नात्यात आणा गोडवा

Subscribe

नात्यात वाद, भांडण होणे ही सामान्य गोष्ट आहे. हे प्रत्येक वैवाहिक किंवा अविवाहित कपल्समध्ये होत राहते. परंतु तुम्ही एकमेकांशी यापूर्वीपेक्षा कमी बोलत असाल किंवा आपले आनंदाचे क्षण पार्टनरसोबत शेअर करत नसाल तर तुमच्यात दुरावा अधिक वाढू शकतो. अशातच दोघांमधील संवाद हा तुमच्या नात्यातील महत्वाचा धागा आहे हे लक्षात ठेवा. जेणेकरुन तुम्हाला ज्या गोष्टींमुळे त्रास होतोय हो मोकळेपणाने पार्टनर सोबत सांगता येईल.

या व्यतिरिक्त जर तुम्ही अधिक भावनिक स्वभावाचे असाल, एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त अशाल तर सर्वात प्रथम स्वत:ला शांत करा. नात्यात पुन्हा गोडवा आणण्यासाठी तुम्ही आधी स्वत: पार्टनरला समजून घेण्यासाठी अथवा समजावण्यासाठी मानसिक रुपात तयार व्हा. पार्टनरला विचारा त्यांना तुमच्या कोणत्या गोष्टी खटकत आहेत. असे केल्याने तुमच्या दोघांमधील वाद कमी होईलच पण ताणाची जी स्थिती उद्भवते ती सुद्धा दूर होईल. म्हणूनच नात्यात संवाद हा नेहमीच असला पाहिजे.

- Advertisement -
communication in married couple (1)
communication in married couple (1)

नवरा-बायकोने भांडण झाल्यानंतर एकमेकांच्या चुका सातत्याने दाखवणे टाळा. यामुळे पार्टनर तुमच्यावर नाराज होऊ शकतोच. पण तुमच्यातील संवादाला ही ब्रेक लागेल. खरंतर एकमेकांच्या चुका समजून घेत माफ करणे ही गोष्ट तुमचे नाते टिकवण्यासाठी फायदेशीर ठरेल.

तसेच जर तुम्ही पार्टनरचे बोलणे काळजीपूर्वक ऐकून घेतले तर तुमच्यातील दुरावा कमी होऊ शकतो. त्यामुळे नेहमीच बोलण्याऐवजी कधीतरी समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेण्याची सवय लावा. कारण काही वेळेस गोष्टी ऐकून घेतल्यानंतर ही समस्यांवर तोडगा निघू शकतो.

- Advertisement -

कपल्सने नेहमीच लक्षात ठेवावे की, तुमच्या डोक्यात जे काही सुरुयं ते समोरच्या व्यक्तीला कळणे मुश्किलच आहे. त्यामुळे पार्टनरने दुसरा पार्टनर हा वेळोवेळी समजूनच घेईल अशी अपेक्षा अजिबात करु नका. असे केल्याने नात्यात वाद वाढू शकतो. तुम्ही तुम्हाला नक्की काय वाटते हे बोलून दाखवू शकत नसाल तर मेसेज करुन पाठवा. पण ते सुद्धा योग्य पद्धतीने सांगा.

 

 


हेही वाचा: Wedding Tips: लग्नानंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini