Saturday, May 4, 2024
घरमानिनीसॅनिटरी पॅड dispose कसे कराल...

सॅनिटरी पॅड dispose कसे कराल…

Subscribe

मासिक पाळी आल्यानंतर काही महिला आपले सॅनिटरी पॅड हे टॉयलेटमध्येच फ्लश करतात. परंतु करणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच सॅनिटरी पॅडची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याची ही योग्य पद्धत नाही. अशातच पॅडची कशा प्रकारे विल्हेवाट लावायची याच बद्दल आम्ही सांगणार आहोत.

-टॉयलेट पेपर मध्ये गुंडाळा
वापरलेले सॅनेटरी पॅड तुम्ही एका प्लास्टिकची पिशवी अथवा टॉयलेट पेपरमध्ये गुंडाळा. असे केल्यानंतर ते तुमच्या घरातील कचरापेटीत टाकू नका, त्यापासून ते दूर ठेवा. जेव्हा कचरेवाला घरी येईल तेव्हा घरातील कचऱ्यासोबत ते द्या. असे न केल्यास बॅक्टेरिया आणि इंफेक्शन पसरण्याची भीती असते.

- Advertisement -

-वेगळा ठेवा डस्टबिन
मासिक पाळीदरम्यान सॅनेटरी पॅड फेकण्यासाठी वेगळा डस्टबिन आणि पेपर बॅग जरुर ठेवा.

-प्लास्टिकमध्ये गुंडाळा
सॅनेटरी पॅड नेहमीच प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून फेका. जर तुम्ही ते व्यवस्थितीत गुंडाळले नाही तर बॅक्टेरिया वाढू शकतात हे लक्षात ठेवा.

- Advertisement -

-फ्लश करु नका
कधीही सॅनेटरी पॅड फ्लश करु नका. अशातच पाइपलाइन जाम होऊ शकते. पॅड अशा पद्धतीने डिस्पोज करणे चुकीचेच आहे.

-बाहेर कसे कराल डिस्पोज
जर तुम्ही बाहेर असाल तर नेहमीच तुमच्यासोबत एक पेपरचा तुकडा ठेवा. वापरलेले पॅड तुम्ही अशावेळी पेपरमध्ये गुंडाळून टाकू शकता.

-जाळू नका
बहुतांश महिला वापरलेले पॅड जाळतात. पण ही चुकीची पद्धत आहे. कधीच पॅड जाळू नका.

-मातीत पुरु नका
बहुतांश लोक वापरलेले पॅड मातीत पुरतात. ही चुक कधीच करु नका. पॅड हे बायोडिग्रेबल नसतात. हे पर्यावरणासाठी योग्य नाही.


हेही वाचा- Period मधल्या Breast pain वर करा हे उपाय

- Advertisment -

Manini