Tuesday, September 26, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion अशी नेसा साडी, सुटलेलं पोट दिसेल आकर्षक

अशी नेसा साडी, सुटलेलं पोट दिसेल आकर्षक

Subscribe

स्टाइलिश दिसण्यासाठी आपण लेटेस्ट फॅशन ट्रेंन्ड फॉलो करतो. बदलत्या फॅशन ट्रेंन्डमध्ये मात्र साडी ही एवरग्रीन आहे. ती काही प्रकारे ड्रेप केली जाते. प्रत्येकालाच आपण साडीमध्ये सुंदर दिसावे असे वाटावे लागते. मात्र वाढलेलं पोट साडीत कसं लपवायचे असा प्रश्न ही पडतो. यासाठी काही खास टीप्स आपण आज पाहणार आहोत.

साडीच्या डिझाइनसाठी तुम्ही लेटेस्ट ट्रेंन्ड फॉलो करू शकता. तर साडी ड्रेप करण्यासंदर्भातील काही व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन दिसतील. परंतु वाढलेले पोटं साडीत लपवायचे असे तर पदर हा थोडा लांब आणि पाठून फिरवुन घेत कंबरेवर पिनअप करू शकता. असे केल्याने तुम्ही स्टाइलिश दिसाल आणि वाढलेलं पोट ही दिसणार नाही.

- Advertisement -

त्याचसोबत आजकाल ट्रेंन्डी कलरचा ऑप्शन तुम्हाला पहायला मिळतो. अशातच साडीत तुमचे पोट लपवायचे असेल तर डार्क रंगांचा वापर करा. डार्क रंग तुम्हाला सुंदर दिसण्यास मदत करेल आणि तुमचा बॉडी शेप ही व्यवस्थितीत दिसेल. यासाठी तुम्ही काळ्या रंगाचा ब्लाउज तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा.

- Advertisement -

तसेच तुम्हाला काही प्रकारच्या ब्लाउजचे डिझाइन्स ऑनलाईन ते ऑफलाइन मिळतील. मात्र साडीत पोटावरील चरबी लपवण्यासाठी तुम्ही लॉन्ग ब्लाउजचा वापर करू शकता. लॉन्ग ब्लाउज तुम्हाला व्यवस्थितीत शेप देण्यास मदत करेल. यामध्ये आजकाल जॅकेट स्टाइल ब्लाउज किंवा कॉर्सेट स्टाइल ब्लाउज फार ट्रेंन्डमध्ये आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही पेप्लम स्टाइल ब्लाउजचा सुद्धा वापर करू शकता.


हेही वाचा-तुमचे ब्लाऊज खांद्यावरून सारखे पडत असेल तर, डॉली जैनच्या ‘या’ टिप्स करा फॉलो….

- Advertisment -

Manini