घरमहाराष्ट्रनितीन देसाईंच्या ND Studio वर होता ठाकरेंचा डोळा; नितेश राणे यांचा खळबळजनक...

नितीन देसाईंच्या ND Studio वर होता ठाकरेंचा डोळा; नितेश राणे यांचा खळबळजनक दावा

Subscribe

काल हिंगोलीत झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. ही टीका करताना उद्धव ठाकरे यांची जीभ घसरल्याचे प्रसारमाध्यमांत म्हटल्या गेले

मुंबई : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कलाविष्काराने सगळ्यांची मने जिंकणारे कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या एनडी स्टुडिओवर (ND Studio) उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे (Uddhav Thackeray-Rashmi Thackeray) यांचा डोळा होता असा खळबळजनक दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे असा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. (Thackeray had his eye on Nitin Desai’s ND Studio; Nitesh Rane’s sensational claim)

काल हिंगोलीत झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. ही टीका करताना उद्धव ठाकरे यांची जीभ घसरल्याचे प्रसारमाध्यमांत म्हटल्या गेले. मात्र, आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सामनात प्रकाशीत झालेल्या अग्रलेखावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आता नितेश राणे यांच्या खळबळजनक खुलास्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळीवर जाते हे पाहणे औत्स्क्याचे ठरणार आहे.

- Advertisement -

ठाकरे सिनेमाचे शुटींग एनडी स्टुडिओत पण पैसे दिले का?

ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या मातोश्रीशी निगडीत माणसाने नितीन देसाई यांना दिल्या होत्या. नितीन देसाईंवर जोरजबरदस्ती केली होती त्यांच्यावर दबाव आणल्या जात होता. आम्हाला कोणाच्या मृत्यूवर राजकारण करायचे नाही. आमचे थोबाड उघडायला लावले तर तुमच्या मालकाचे वस्त्रहरण करणार असे मी राऊतांना सांगितले होते. एनडी स्टुडीओ घेण्यासाठी नितीन देसाईंचा मानसिक छळ उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी केला. ठाकरे सिनेमाचे काही शुटींग एनडी स्टुडिओमध्ये केले होते. त्याचे पैसे दिले होते का? अजूनपर्यंत त्या शुटींगचा चेक दिला होता का याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यायला हवे सा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला.

हेही वाचा : अजित पवार मुख्यमंत्री होणे अशक्य; छत्रपती संभाजीराजेंच्या दाव्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया, म्हणाले…

- Advertisement -

बाळासाहेबांचा छळ केल्याचाही केला आरोप

पत्रकार परिषद घेऊन बोलताना नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, आता यांना वडिलांचे प्रेम आल आहे. पण बाळासाहेब ठाकरेंना हयात असताना उद्धव ठाकरे कुटुंबीय त्यांना म्हातारा म्हणून हाक मारायचे. बाळासाहेब जी रुद्राक्ष माळ घालायचे ती माळ कचऱ्याच्या डब्यात फेकून टाकली होती असाही खुलासाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा : पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार म्हणाले, ‘तुझ्या तोंडात साखर पडो…’

इंडिया आघाडीच्या बैठकीला कुणी पैसे खर्च केले?

पुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, मोदी यांनी बिलकिस बानो यांच्याकडून राखी बांधून घ्या म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी कंगना, नवनीत राणा यांच्याकडून राखी बांधून दाखवावी. उद्धव ठाकरेंचे राजकीय धर्मांतरण झाले आहे. हिंदुत्वासोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. नितीन देसाई मातोश्रीवर भेटायला गेले तेव्हा त्यांना भेटही दिली नाही. लंडनची सुट्टी कुठल्या गुजराती व्यापाऱ्याच्या पैशावर केली ते जाहीर करा. इंडिया आघाडीच्या बैठकीला कुणी पैसे खर्च केलेत ते आम्ही जाहीर करू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -