Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health गरजेपेक्षा अधिक डाळ खाणे ठरेल आरोग्यासाठी धोकादायक

गरजेपेक्षा अधिक डाळ खाणे ठरेल आरोग्यासाठी धोकादायक

Subscribe

व्हेजिटेरियन लोक आपल्या डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश करतात. त्यावेळी ते त्यामध्ये डाळीचा समावेश जरूर करतात. डाळ आपण ही आपल्या नेहमीच्या जेवणात खातो आणि याचे काही आरोग्यदायी फायदे सुद्धा होतात. याच्या माध्यमातून आपल्याला व्हिटॅमिन बी, फोलेट, लोह आणि पोटॅशिअम मिळते. त्याचसोबत यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण खुप असते. त्यामुळेच याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

मात्र असे म्हटले जाते की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. असेच काहीसे डाळीबद्दल ही आहे. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा अधिक याचे सेवन करता तेव्हा काही समस्या उद्भवू शकतात.

- Advertisement -

पचनक्रियेवर होतो परिणाम
जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा अधिक डाळीचे सेवन करता तेव्हा पचनक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. खरंतर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. जेव्हा ते अधिक खाल्ले जातात तेव्हा शरीराला ते पचण्यास मुश्किल होते. अशा स्थितीत लोकांना सूज, गॅस, मळमळ किंवा पोट आवळणे अशा समस्या होतात.

डाळीमुळे न्युट्रिशन डेफिशिएंसी होऊ शकते
डाळीमध्ये काही पोषक तत्त्वे असतात. याचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला न्युट्रिशन डेफिशिएंसीची समस्या होते. खरंतर यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशिअम असते. जे शरिरात सोडियम, पोटॅशिअम आणि इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स बिघडू शकते. अशा प्रकारे डाळीत फाइटेट्स नावाचे कंपाउंड्स असतात. जे लोह, जिंक आणि कॅल्शिअम सारखे मिनिरल्सच्या अब्जॉर्बशनसाठी समस्या होते.

- Advertisement -

वजन वाढले जाते
बहुतांश लोक वेट लॉससाठी डाळीचा समावेश करू शकता. मात्र याचे नियमित रुपात अधिक सेवन केल्यास तर हळूहळू वजन वाढू शकते. यामध्ये पुरेश्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट आणि कॅलरी असतात. त्यामुळे ते अधिक खाल्ल्यास यामुळे तुमचा कॅलरी काउंड बिघडला जातो. यामुळेच वजन वाढण्यासह अन्य हेल्थ प्रॉब्लेम्स ही सुरु होतात.


हेही वाचा- ‘हे’ पदार्थ शरीराबाहेर फेकतात विषारी रसायने

- Advertisment -

Manini