Thursday, May 2, 2024
घरमानिनीRelationshipतुम्ही सिंगल पॅरेंट आहात तर स्वत:ला असे ठेवा आनंदी

तुम्ही सिंगल पॅरेंट आहात तर स्वत:ला असे ठेवा आनंदी

Subscribe

सिंगल मदर किंवा फादर असणे ही एक फार मोठी जबाबदारी असते. मुलांवर नेहमीच उत्तम संस्कार करणे सुद्धा पालकांच्या हातात असते. जेव्हा या दोघांपैकी एक व्यक्ती नसेल तर ही जबाबदारी तुमच्यावर बोजा असल्याचे वाटू लागते. परिणामी यामुळे मानसिक ताण वाढला जातो. अशातच काही गोष्टी बिघडू लागतात. जर तुम्ही सुद्धा सिंगल पॅरेंट असाल तर त्यावर नक्की तोडगा काढा. कारण याचा परिणाम मुलावर सुद्धा होऊ शकतो.

अशा पद्धतीने स्वत:ला ठेवा आनंदित
-सेल्फ केअरवर लक्ष द्या

- Advertisement -


स्वत:वर लक्ष द्या. अशा गोष्टींसाठी वेळ काढा ज्यामधून तुम्हाला आनंद होतो. तुम्ही तणावमुक्त असता. याची सुरुवात तुम्ही योगा किंवा व्यायामाच्या मदतीने करा. दररोज कमीत कमी 20-30 मिनिटांसाठीचा वेळ स्वत:ला द्या. मेडिटेशन करा. सेल्फ ग्रुमिंगवर लक्ष द्या. खरंतर सेल्फ केयरचा अर्थ असा होत नाही, स्वत:ला फिजिकली ग्रुम करावे तर मानसिक ताण ही दूर करावा.

-घरातच राहू नका, बाहेर पडा

- Advertisement -


सिंगल मदर किंवा फादर असाल तर त्याची लाज बाळगू नका. काही लोक यामुळे घराबाहेर पडत नाही. यामुळे मानसिक ताण वाढला जातो. घरातील काम किंवा ऑफिसनंतर स्वत:साठी वेळ काढा. मित्रपरिवाला भेटा. यामुळे तुमचा ताण दूर होईल.

-मुलांसाठी वेळ काढा


मुलं तुमची प्रायोरिटी आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा वेळ घालवा. यामुळे तुम्हाला आणि मुलांना सुद्धा आनंदित वाटेल. या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत एखाद्या ट्रिपला जा. मुलाला त्यांच्याबद्दल विचारत रहा.


हेही वाचा- विवाह करण्यापूर्वी नक्की करा प्री मॅरिटल काउंसिलिंग

- Advertisment -

Manini