घरफोटोगॅलरीPhoto : एका प्रदेशाध्यक्षाची दुसऱ्या प्रदेशाध्यक्षाला कडकडून मिठी... राष्ट्रवादींच्या भेटीने सर्व अचंबित

Photo : एका प्रदेशाध्यक्षाची दुसऱ्या प्रदेशाध्यक्षाला कडकडून मिठी… राष्ट्रवादींच्या भेटीने सर्व अचंबित

Subscribe

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज, सोमवारी दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाचा पहिला दिवस होता. पण तेथील एक दृश्याने सारेच अचंबित झाले. एकाच पक्षाच्या दोन विद्यमान प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली.

- Advertisement -

 

ऐन पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे एकमेकांना भेटले.

- Advertisement -

प्रथम खासदार सुनील तटकरे यांना विधिमंडळात पाहताच आमदार जयंत पाटील यांनी त्यांना मागून मिठी मारली. त्यानंतर ते हास्यविनोद रंगले. राज्यात आपापसातील राजकारण शिगेला पोहोचले असतानाही वैयक्तिक मैत्रीचे धागे पाहायला मिळाले, याचीच चर्चा विधिमंडळात सुरू होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -