Sunday, May 5, 2024
घरमानिनीHealthआजारांपासून दूर राहण्यासाठी खा शेंगदाणे

आजारांपासून दूर राहण्यासाठी खा शेंगदाणे

Subscribe

बहुतांश हेल्थ एक्सपर्ट्स असा सल्ला देतात की, नात्यात काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खावे. जेणेकरुन दिवसभर शरीराला काम करण्यासाठी उर्जा मिळेल आणि पोट ही दीर्घकाळ भरलेले राहिल. बहुतांश लोक नाश्तात तळलेले पदार्थ खातात. मात्र काही लोक सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आहाराची निवड करतात. यासाठी मोड आलेले चणे, मूग, दूध-ब्रेड खातात. मात्र तुम्ही दिवसाची सुरुवात मोड आलेली कडधान्ये अथवा पौष्टिक गोष्टींचे सेवन करत असाल तर आरोग्याला याचा मोठा फायदा होतो.

अशातच शेंगदाणे खाण्याचा नक्की काय फायदा होतो हे पाहूयात. तसेच त्यांचा कोणत्या प्रकारच्या नाश्त्यात समावेश केल्याने अधिक फायदा होतो हे सुद्धा पाहूयात. शेंगदाणे आपण बहुतांशवेळा उपवासावेळी खातो. परंतु तुम्ही कधी भिजवलेले शेंगदाणे खाल्ले आहेत का? याचे फायदे काय होतात हे आपण पाहूयात.

- Advertisement -

-पचनक्रिया उत्तम होते
आपल्या सर्वांना माहिती आहे की, शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. हे एक फायबर फूड आणि फायबर फूड डाइजेशनसाठी उत्तम मानले जातात. यासाठी तुम्ही सुक्या शेंगदाण्याऐवजी भिजवलेले शेंगदाणे खा. जेणेकरुन पचनक्रिया सुधारली जाते.

- Advertisement -

-मेंदू आणि डोळ्यांसाठी उत्तम
भिजवलेले शेंगदाणे नाश्त्यात खाल्ल्याने तुमची बुद्धि तल्लक होते. त्याचसोबत स्मरणशक्ती वाढली जाते. या व्यतिरिक्त तुम्ही पाहिले असेल की, जर तुम्हाला डोळ्यांना दिसण्यास समस्या येत असेल तर भिजवलेले शेंगदाणे खा.

-स्किनसाठी फायदेशीर
भिजलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने तुमच्या स्किनची चमक वाढली जाते. जर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर याचे दररोज सेवन करा. काही दिवसातच तुम्हाला स्किनमध्ये फरक दिसून येईल. तुम्ही भिजवलेल्या शेंगदाण्यासह दोन बदाम आणि मूग डाळ भिजवू शकता.


हेही वाचा- सांधेदुखी कमी करण्यासाठी तोंडली खा

- Advertisment -

Manini