घरमुंबईविविध आजारांचा मुंबईला विळखा; मलेरिया अन् डेंग्यू आजाराचे रुग्ण सप्टेंबर महिन्यात अधिक

विविध आजारांचा मुंबईला विळखा; मलेरिया अन् डेंग्यू आजाराचे रुग्ण सप्टेंबर महिन्यात अधिक

Subscribe

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असली तरी शहाराच्या विविध भागात पावसाच्या रिमझिम सरी सुरूच आहेत. त्यामुळे विविध आजारांचा मुंबई विळखा कायम असल्याचे गेल्या दोन महिन्यांच्या साथीच्या आजाराच्या रुग्णांची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येते. यासाठी महापालिकेने, तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी आपल्या आसपासच्या परिसरात डासांची उत्पत्ती स्थळे निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे  आवाहन नागरिकांना केले आहे. (Mumbai is plagued by various diseases Malaria and dengue patients are more in the month of September)

हेही वाचा – रुग्ण मृत्यूच्या दारात, पण औषध मिळत नाही; अंबादास दानवेंचे सरकारवर गंभीर आरोप

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यापेक्षा सप्टेंबर महिन्यात मलेरिया आणि डेंग्यू आजाराचे रुग्ण अधिक असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मलेरिया आणि डेंग्यू आजारापेक्षा लेप्टो, गॅस्ट्रो, चिकनगुनिया, हेपेटायटिस आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून आले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे काही ठिकाणी पाण्याची डबकी साचून त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. हे डास नागरिकांना चावा घेतल्यानंतर मलेरिया आणि डेंग्यूचा संसर्ग होत असल्याचे सध्या चित्र शहरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आसपासच्या परिसरात डासांची उत्पत्ती स्थेळ निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत वाढ

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा 1 ते 30 जुलै या एक महिन्याच्या कालावधीत गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत सर्वात मोठी वाढ आढळून आली होती. गतवर्षी जुलैमध्ये गॅस्ट्रो रुग्णांची संख्या 679 एवढी होती, मात्र यंदा त्यात तब्बल 970 ने वाढ झाली असून ती संख्या 1,649 वर गेली होती. वास्तविक, जून महिन्यात गॅस्ट्रो रुग्णसंख्या 1,744 वर गेली होती. त्यापाठोपाठ डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ झाली होती. गतवर्षी जुलैमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 61 एवढी होती, मात्र यंदा त्यात तब्बल 518 ने वाढ झाली होताना ती संख्या 579 वर गेली आहे. तसेच, गतवर्षी लेप्टो रुग्ण संख्या 65 एवढी होती.

- Advertisement -

हेही वाचा – MLA Disqualification Case : 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सलग दुसऱ्यांदा लांबणीवर; ‘हे’ आहे कारण?

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील रुग्णांची संख्या

मलेरिया
ऑगस्ट  – 1,080
सप्टेंबर – 1,313

डेंग्यू
ऑगस्ट  – 999
सप्टेंबर – 1,360

लेप्टो
ऑगस्ट  – 301
सप्टेंबर – 73

गॅस्ट्रो
ऑगस्ट  – 948
सप्टेंबर – 573

हेपेटायटिस
ऑगस्ट  – 103
सप्टेंबर – 63

चिकनगुनिया
ऑगस्ट  – 35
सप्टेंबर – 31

स्वाइन फ्लू

ऑगस्ट  – 116
सप्टेंबर – 18

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -