Thursday, May 16, 2024
घरमानिनीHealthपोटात गॅस तयार करतात 'या' डाळी

पोटात गॅस तयार करतात ‘या’ डाळी

Subscribe

आपल्यातील बहुतांशजणांना पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होते. पोटात गॅस तयार झाल्याने संपूर्ण दिवसभर कोणत्याही कामात लक्ष सुद्धा लागत नाही. काही डाळींमुळे खरंतर पोटात गॅस तयार होतो आणि ब्लोटिंगची समस्या ही उद्भवते. जर तुम्ही रात्री किंवा दिवसाच्या वेळी खाण्यात डाळींचा समावेश करत असाल तर तत्पूर्वी जाणून घ्या अशा कोणत्या डाळी आहेत ज्यामुळे पोटासंबंधित समस्या वाढू शकतात. जर तुम्हाला आधीपासूनच पोटात गॅस तयार होण्याची समस्या असेल तर पुढील काही डाळी खाणे टाळा.

-चणा डाळ

- Advertisement -


चण्याच्या डाळीत हाय फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट असतात. त्यामुळे काही लोकांना ती पचण्यास जड जाते. याच कारणास्तव पोटात गॅस किंवा पोट फुगते. चण्याची डाळ खाल्ल्यानंतर सूज किंवा बैचेन वाटणे अशा सुद्धा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये त्याचा मर्यादित प्रमाणात वापर करावा.

-राजमा

- Advertisement -


राजमा आपल्या हाय फायबरसाठी ओळखला जातो. जो गॅस वाढण्याचे कारण ठरू शकतो. राजमा व्यवस्थितीत भिजवून शिजवल्याने पोटात गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते.

-तूर डाळ


तूर डाळीमुळे सुद्धा पोटात गॅस तयार होऊ शकतो. तूर डाळ खाल्ल्यानंतर तुम्हाला पोट फुगीची समस्या दिसून आल्यास तर त्याचे सेवन कमी करण्याचा विचार करा.

-उडदाची डाळ


उडदाच्या डाळीत फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. ही डाळ आरोग्यसाठी फायदेशीर असते. मात्र काही लोकांना ही डाळ खाल्ल्यानंतर पोटफुगीची समस्या निर्माण होऊ शकते.

-मूगाची डाळ


मूगाची डाळ सर्वसामान्यपणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र काही प्रकरणी यामुळे पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. मूग डाळ शिजवताना ती व्यवस्थितीत शिजवावी असा सल्ला दिला जातो. जर तुम्ही मूगाच्या डाळीची खिचडी खात असाल तर त्या सोबत एक ग्लास छास सुद्धा प्या.


हेही वाचा- व्हेजिटेरियन लोकांना असतो हिप फ्रॅक्चरचा धोका

- Advertisment -

Manini