Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthबाळाला मीठ किंवा साखर का देऊ नये?

बाळाला मीठ किंवा साखर का देऊ नये?

Subscribe

जर तुम्हाला वाटत असेल साखर आणि मीठाचे अधिक सेवन केल्याने केवळ मोठ्यांनाच नुकसान होते तर असे नाही. खरंतर या दोन्ही पदार्थांच्या सेवनाचा परिणाम बाळावर सुद्धा होतो. याच्या सेवनाने त्यांची किडनी, दात आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची समस्या उद्भवते. अशातच एक्सपर्ट असे सांगतात की, जो पर्यंत बाळ 6 महिन्यांचा होत नाही तो पर्यंत त्याला साखर किंवा मीठ देऊ नका. परंतु काही पालकांना असे वाटते की, बाळाला साखर किंवा मीठ नाही दिले तर त्यांना सोडियम कसे मिळेल. तर त्यांची ही गरज दुधाने पूर्ण होऊ शकते. 6 महिने ते एका वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांना एक ग्रॅम पेक्षा अधिक मीठ देऊ नये. (Avoid sugar and  salt for child)

मुलांच्या डाएटमध्ये साखर किंवा मीठ कमी करावे 
-ब्रिटल बोनचा धोका
मीठाचे अधिक सेवन करणे हाडांसाठी हानिकारक असते. यामुळे शरिरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते. जर शरिरात पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम नसेल तर हाडं कमकुवत होऊ शकतात.

- Advertisement -

-डिहाइड्रेशनचा धोका
ज्या मुलांच्या डाएटमध्ये अधिक सोडियम असते ते डिहाइड्रेशनचे शिकार होऊ शकतात. यामुळे शरिरातील पाणी घाम किंवा लघवीच्या रुपात बाहेर पडतो. लहान मुलांना बोलता येत नाही. अशातच त्यांच्या शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. याच लक्षणांमुळे किडनी स्टोन, अंग दुखी, बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.

-हाय ब्लड प्रेशरची समस्या
डाएटमध्ये अधिक मीठ असेल तर रक्तातील बीपीचा स्तर वाढला जातो.यामुळे हायपर टेंनशची समस्या होऊ शकते. ही समस्या बालपणी सुद्धा उद्भवू शकते. त्याचसोबत हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक असते.

- Advertisement -

-किडनी स्टोनची समस्या
शरिरात अधिक सोडिमचे प्रमाण असेल तर लघवीच्या माध्यमातून कॅल्शिअम निघते. हे कॅल्शिअम किडनीत स्टोन निर्माण करु शकते. किडनी स्टोनमुळे बाळाला अंग दुखणे, थंडी वाजणे, ताप येणे अशा समस्या येऊ शकतात.

-किडनीवर होतो परिणाम
जर बाळाला अधिक प्रमाणात मीठ दिल्यास तर त्याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाळाला गरजेपेक्षा अधिक मीठ किंवा साखक दिली तर त्याला बहुतांश शारिरीक स्थितींचा सामना करावा लागू शकतो.


हेही वाचा- Hypertention- मुलांनाही होतो हायपरटेंशनचा त्रास , ही आहेत लक्षणे

- Advertisment -

Manini