Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health प्रेग्नेंसीपूर्वी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

प्रेग्नेंसीपूर्वी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

Subscribe

फर्टिलिटीची समस्या झाल्यानंतर तज्ञ आणि घरातील मंडळी हेल्दी आणि संतुलित आहार खाण्याचा सल्ला देतात. यामुळे प्रजनन क्षमतेत सुधारणा होते. धान्य, वसा, प्लांट बेस्ड प्रोटीन जसे की, डाळ, बीन्स असे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. हे खरं आहे की, प्रेग्नेंसीपूर्वी आणि त्या दरम्यान पोटातील बाळाच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी तुम्ही घेत असलेला आहार हा फार महत्त्वाचा असते. त्याकडे अधिक लक्षण देण्याची गरज असते. हेल्दी आहाराव्यतिरिक्त अशा काही गोष्टी असतात त्याकडे लक्ष देणे फार गरजेचे असते, त्यामुळे फर्टिलिटी वाढते आणि प्रेग्नेंट होण्यास मदत होते. (Pregnancy advice)

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, कधीकधी लहान समस्येमुळे सुद्धा प्रेग्नेंट होण्यास उशिर होऊ शकतो. प्रेग्नेंसीपूर्वी काही चाचण्या करणे, फोलिक अॅसिड घेणे आणि आपले वजन नियंत्रणात ठेवणे सुद्धा फार महत्त्वाचे असते. फर्टिलिटीसाठी सर्वात गरजेचे म्हणजे फिजिकल अॅक्टिव्हिटीकडे लक्ष देणे.

- Advertisement -

फर्टिलिटीसाठी मदत करतील पुढील टीप्स
फोलिक अॅसिड घेण्यास सुरुवात करा
काही वेळेस महिला प्रेग्नेंसीसाठी प्रयत्न करतात आणि एका महिन्यातच त्या प्रेग्नेंट होतात. मात्र एखादी महिला गर्भनिरोधक गोळी घेत असेल तर ती बंद करण्याच्या दोन महिन्यांआधी फोलिक अॅसिड घेण्यास सुरुवात करावी. मुलांमध्ये न्युरल ट्युब दोषामुळे काही सुरक्षितता निर्माण करण्यासाटी शरिरात फोलिक अॅसिड निर्माण करणे गरजेचे असते.

हेल्दी वजन असणे गरजेचे
प्रेग्नेंसीपूर्वी तुमचा बीएमआय 18.5 आणि 24.9 च्या दरम्यान असावा. 25 पेक्षा अधिक बीएमआय असेल तर प्रजनन क्षमता कमी होऊ शकते आणि प्रेग्नेंसी दरम्यान समस्येचा धोका वाढू शकतो. अधिक वजन असल्याने पुरुषांमध्ये सुद्धा प्रजननासंबंधित समस्या उद्भवू शकतात. जर बीएमआय 30 पेक्षा अधिक असेल तर धोका अधिक वाढू शकतो. मात्र तो 18.5 किंवा कमी असेल तरीही प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते. त्यामुळे बीएमआयला नियंत्रित करण्याचा प्रयत्न जरुर करा.

- Advertisement -

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं घेऊ नका
काहीवेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेतली जातात. त्यामुळे फर्टिलिटीसाठी समस्या उद्भवू शकतात. काही महिला अज्ञातपणे कॅनबिस किंवा कोकीन सारखी अवैध औषधं घेऊ लागतात. यामुळे सुद्धा ड्रग्ज किंवा नशा असणारी औषधं ही याच्या फर्टिलिटीसाठी कारणे होऊ शकते. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं घेऊ नका.

सर्वाईक स्क्रिनिंग टेस्ट
जर महिलेचे वय 25-49 दरम्यान आहे तर तिने प्रत्येक तीन वर्षात सर्वाईक स्क्रिनिंग टेस्ट करावी. प्रेग्रेंसीपूर्वी ही चाचणी करणे सर्वाधिक बेस्ट आहे. यामुळे प्रेग्नेंसीबद्दल कळू शकते.

सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीजचा तपास करा
सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीज प्रजनन क्षमतेसह प्रेग्नेंसी आणि बाळाला सुद्धा प्रभावित करू शकते. जर तुम्हाला अथवा पार्टनरला एसटीआय असेल तर दोघांनी टेस्ट करणे गरजेचे असते. सेक्शुअली ट्रांसमिटेड डिजीज या फर्टिलिटी किंवा मुलं उशिराने होण्याचे कारण होऊ शकते.


हेही वाचा- स्वत:साठी अशी निवडा गायनेकोलॉजिस्ट

- Advertisment -

Manini