Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र संशय बळावला अन् त्याने लिव्ह-इन रिलेशनशिपमधील प्रेयसीलाच संपवले

संशय बळावला अन् त्याने लिव्ह-इन रिलेशनशिपमधील प्रेयसीलाच संपवले

Subscribe

नाशिक : सात वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीचा चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. होलाराम कॉलनीत मंगळवारी (दि. १५) ही घटना घडली. कौटुंबिक वाद व त्यानंतर मुलास मारल्याच्या कारणातून हा प्रकार घडल्याचे समेार आले आहे. श्याम अशोक पवार (३२, रा. कस्तुरबा नगर, होलाराम कॉलनी, नाशिक) असे प्रियकराचे नाव आहे. आरती श्याम पवार (२९, रा. कस्तुरबा नगर, होलाराम कॉलनी, नाशिक) असे मयत प्रेयसीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व दिनेश शिवाजी पवार (रा. ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, पतीने आरतीला सोडून दिल्यानंतर आरतीची ओळख हमाली काम करणार्‍या श्याम पवारशी झाली. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गेल्या सात वर्षांपासून ते दोघेही एकत्र राहत होते. आरतीला पहिल्या पतीपासून दोन मुली तर श्यामपासून एक मुलगा व मुलगी आहे. आरती कामानिमित्त तिच्या नंंदेकडे गेलेली होती. परत आल्यानंतर श्याम पवार व आरती यांच्यात मंगळवारी (दि. १५) सायंकाळी वाद झाला. श्याम पवारने आरतीच्या मुलाकडे पिण्यासाठी पाणी मागितले असता मुलाने नकार दिला. त्यातून राग अनावर झाल्याने संशयित श्याम पवार याने आरतीच्या मुलाला मारहाण केली. त्यावेळी आरतीने श्यामला मारहाण केली.

- Advertisement -

रागाच्या भरात श्यामने घरातील चाकूने आरतीला पाठीमागून भोसकले. घाव वर्मी लागल्याने आरती जागेवर कोसळली. श्यामने तातडीने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात डॉ. श्रावण गायकवाड यांनी आरतीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यावेळी तिच्या पाठीत चाकूसदृश्य हत्याराने खोलवर भोसकल्याचे समोर आले. ही बाब पोलिसांना समजली. पोलिसांनी तात्काळ संशयित श्याम पवारला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -