Tuesday, May 14, 2024
घरमानिनीटॅम्पॉनचा वापर करत असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा

टॅम्पॉनचा वापर करत असाल तर ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

Subscribe

आजकाल बहुतांश महिला मासिक पाळीदरम्यान, सॅनिटरी पॅड्स नव्हे तर टॅम्पॉनचा अधिक वापर करणे पसंद करतात. वारंवार सॅनिटरी पॅड बदलणे किंवा पॅड्सच्या सातत्याने वापरामुळे होणारे रॅशेज किंवा इरिटेशनमुळे महिला टॅम्पॉनचा वापर करणे पसंद करतात. दरम्यान, बहुतांश मुली अथवा महिलांना याचा योग्य प्रकारे कसा वापर करावा हे माहिती नसते. ज्यामुळे समस्या अधिक वाढतात.दरम्यान, संक्रमणापासून दूर राहण्यासाठी टॅम्पॉन योग्य पद्धतीने वापरणे आणि त्या संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे.

टॅम्पॉन संदर्भातील सेफ्टी टीप्स
-टॅम्पॉन वापरण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा
  
बॅक्टेरियाचा प्रसार कमी करण्यासठी टॅम्पॉनचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर सुद्धा आपले हात स्वच्छ धुवावेत असा सल्ला दिला जातो. जर तुमची नखं मोठी असतील तर ती कापा.

- Advertisement -

-फ्लो नुसार टॅम्पॉनची निवड करा


टॅम्पॉन वारंवार इंसर्ट करणे किंवा काढताना होणाऱ्या फ्रिक्शनमुळे वजाइनच्या वॉलमध्ये माइक्रोटीयर्स तयार होऊ शकतात. ज्यामुळे बॅक्टेरियामुळे होणाऱ्या संक्रमणाचा अधिक धोका वाढतो. यामुळेच तुम्ही फ्लो आणि गरजेनुसार योग्य टॅम्पॉन निवडा.

- Advertisement -

-मासिक पाळीवेळीच करा वापर


तज्ञ असे सांगतात की, काही महिला मासिक पाळी आली नाही तरीही टॅम्पॉनचा वापर करतात. कारण त्यांना ते स्वच्छ ठेवतात. खरंतर टॅम्पॉन डिस्चार्ज शोषून घेतात. काही महिला ते अशासाठी घालतात कारण त्यांना माहिती नसते की, ब्लिडिंग कधी होईल. परंतु असे केल्याने बॅक्टेरिया वाढू शकतात. अशातच जळजळ, सूज येणे किंवा संक्रमण होऊ शकते.

-इंटरकोर्स करताना वापरु नका


इंटरकोर्स दरम्यान टॅम्पॉन तुमच्या वजाइनामध्ये जाऊ नये म्हणून ते काढून टाका. अन्यथा समस्या येऊ शकते. यामुळे टीएसएसचा धोका सुद्धा वाढतो.

 


हेही वाचा: Toxic shock syndrome म्हणजे नक्की काय?

- Advertisment -

Manini