घरनवी मुंबईकेंद्रीय गृहमंत्री येणार म्हणून खारघरमधला रस्ता एका दिवसात झाला तयार

केंद्रीय गृहमंत्री येणार म्हणून खारघरमधला रस्ता एका दिवसात झाला तयार

Subscribe

शहरात कोणी मोठा मंत्री येणार असला की सर्व यंत्रणा कशा कामाला लागतात...याचं उत्तम उदाहरण खारघरमध्ये दिसून आलंय.

नवी मुंबईतील खारघर इथे येत्या १६ एप्रिल रोजी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने होणारा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खारघरमध्ये येणार आहेत. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खारघरमध्ये येणार म्हणून खारघरवासियांचं नशीबंच उजळलं. कारण मंत्रीमंडळ येणार म्हणून खारघरमध्ये चक्क एका दिवसात रस्ता तयार झालाय. आणखी एक विशेष म्हणजे याच रस्त्यासाठी खारघरवासी गेल्या १५ ते २० वर्षापासून संघर्ष करत होते.

शहरात कोणी मोठा मंत्री येणार असला की सर्व यंत्रणा कशा कामाला लागतात…याचं उत्तम उदाहरण खारघरमध्ये दिसून आलंय. केंद्रीय मंत्री हे खारघरमध्ये येणार असल्याने फक्त रस्तेच चकाचक झाले नाहीत तर रस्त्याच्या दुभाजकांवर वाढलेल्या झाडी-झुडपांची छाटणी सुद्धा केली. रस्त्याच्या दुभाजकांच्या कठड्यांना पुन्हा रंग चढवण्यात आल्यामुळे खारघर शहर अगदी चकाचक झालंय. मंत्र्यांच्या स्वागतासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून ते येणारे मार्ग अत्यंत सुव्यवस्थित आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केलाय. वाहनांची कोंडी होऊ नये याची खबरदारी सुद्धा घेण्यात आलीय.

- Advertisement -

हे ही वाचा: “हे नाणं दिसतया शोभून बाबासाहेबांच्या फोटूनं”: महामानवाला चित्रकाराकडून अनोखं अभिवादन…

केंद्रीय मंत्र्यांना खारघरमधून सायन पनवेल हायवेवर बाहेर पडता यावं म्हणून कोपरा गावासमोर मोठा रस्ता तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ ते २० वर्षापासून इथले गावकरी रस्त्यासाठी मागणी करत होते. पण केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या कृपेने हा रस्ता अवघ्या एका दिवसात तयार झालाय. ही किमया पनवेल महानगरपालिकेने साधली आहे. त्यामुळे रोज मंत्र्यांचे दौरे शहरात झाले तर शहर किती सुंदर दिसेल अशा उपरोधिक भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -