घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: ...म्हणून त्यांना उसन्या भाटांची गरज पडली नाही; अंबादास दानवे...

Lok Sabha 2024: …म्हणून त्यांना उसन्या भाटांची गरज पडली नाही; अंबादास दानवे यांची शिवसेनेवर टीका

Subscribe

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 40 नेत्यांची नावे आहेत. या यादीवरूनच शिवसेना उद्धव गटाचे नेता आणि विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उमेदवारांची चाचपणी करण्यासोबतच लोकांच्या जवळचा नेता, प्रभावी वक्तृत्व, आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांची निवड करून प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर टाकणे, या निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. भाजपाने महाराष्ट्रासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील आपली स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यावरच उद्धव गटाने टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha 2024: सांगलीसाठी देशाचं पंतप्रधानपद घालवणार का? राऊतांचा काँग्रेसला थेट सवाल

ट्विटमध्ये काय?

वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले जातात.
बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणाऱ्यांनी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या दहामध्ये पाच नावे भाजप नेत्यांची आहेत. तर एकूण यादीत २५ टक्के प्रचारक हे परपक्षाचे आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने कधीच कमी नव्हते आणि त्यांना असल्या उसन्या भाटांची गरज पडली नाही. ते विचार तुम्हाला कळले नाहीत, म्हणूनच या उसन्या प्रचारकांच्या, उसन्या विचारांच्या आणि भंपक योजनांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत.

- Advertisement -

मोडेन पण वाकणार नाही, हा सुविचार महाराष्ट्राचा स्वभाव दर्शवतो.. यांचा कारभार उलटा आहे.. ‘वाकेन पण मोडणार नाही’!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. लोकसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात सुरू होणार आहेत. महाराष्ट्रात पाच तर देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली आहे. स्टार प्रचारक म्हणून एकनाथ शिंदे यांनी ४० नावं जाहीर केली आहेत. या यादीत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रिपाईं अध्यक्ष रामदास आठवले यांचाही समावेश आहे.

हेही वाचा – Air India : दारू पिऊन उडवले विमान; एअर इंडियाने केले वैमानिकाला निलंबित

यादीत राहुल शेवाळेंचं नावच नाही

या यादीत राहुल शेवाळेंचं नाव नाही, याची चर्चा आता रंगली आहे. शिवसेनेच्या लोकसभेतले प्रमुख नेते म्हणजे राहुल शेवाळे. स्टार प्रचारकांच्या या यादीत त्यांचं नाव नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -