Saturday, April 27, 2024
घरमानिनीBeautyस्किन ग्लो करण्यासाठी 'हे' ज्यूस फायद्याचे

स्किन ग्लो करण्यासाठी ‘हे’ ज्यूस फायद्याचे

Subscribe

पौष्टीक आहार तुमच्या शरीराला आतूनच नव्हे तर बाहेरूनही निरोगी ठेवण्यास मदत करतो. विशेषतः निरोगी त्वचा मिळविण्यासाठी भाज्या आणि फळांचे रस घेणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ज्यूसमुळे त्वचेची संबंधित अनेक विकार दूर होतात आणि त्वचा सुंदर,चमकदार बनते. या ज्यूसच्या नियमित सेवनाने तुमचे सौंदर्य अनेक पटींनी वाढू शकते.

बहुतेक भाज्या आणि फळांमध्ये फायबर असते आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. जे आपल्या त्वचेवर परिणाम करणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. त्यांच्यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स देखील असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सची वाढ आणि प्रभाव रोखतात, जे शरीराच्या पेशींना नुकसान करण्यास जबाबदार असतात.

- Advertisement -

गाजर आणि बीटरूट ज्यूस –
गाजर आणि बीटरूट जूस त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पोटॅशियम, झिंक, फॉलिक ऍसिड, मॅगनीज आणि व्हिटॅमिन सी यासह अनेक आवश्यक पोषक घटकांसह बीटरूट त्वचेसाठी पॉवर-पॅकसारखे काम करते. हे सर्व रक्त शुद्ध करण्यासाठी ओळखले जाते, ज्यामुळे त्वचेला चमक येते. गाजरात व्हिटॅमिन ए असते. जे त्वचेचे मुरूम आणि सुरकुत्यांपासून संरक्षण करते. या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पोट साफ राहते आणि त्वचा चमकदार बनते.

काकडीचा ज्यूस –
काकडीचा ज्यूस त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतो. ज्यामुळे त्वचा चमकू लागते. काकडीमध्ये एस्कोर्बिक ऍसिड आणि काफीक ऍसिड असते. जे पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्वचेची जळजळ कमी होते.

- Advertisement -

टोमॅटो ज्यूस –
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट्स घटक असतात. जे सुरकुत्या आणि बारीक रेषा यासारख्या अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा तरुण दिसायला सुरवात होते. टोमॅटो त्वचेची छिद्रे आकुंचन करण्यास, टॅनिग काढून टाकण्यास आणि सिबम कमी करण्यास मदत करते. एक ग्लास टोमॅटोचा ज्यूस नियमितपणे पिणे हा निश्चितच चमकदार त्वचेसाठी एक उत्तम उपाय आहे.

डाळिंबाचा ज्यूस –
डाळिंबात रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते, ज्यामुळे त्वचेचे पोषण होते आणि चमकदार बनते. त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे त्वचा सुंदर आणि तरुण दिसू लागते. त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी डाळिंबाचा रस नियमित प्यावा.

हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस –
हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस चवदार नसला तरी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. पालकाचा ज्यूस लोह आणि व्हिटॅमिन्सनी सम्रुद्ध मानला जातो. जे निर्दोष त्वचा मिळविण्यासाठी आवश्यक असते. पालकामध्ये व्हिटॅमिन सी, इ आणि मॅगनीजसारखे पोषक असतात आणि त्यात अँटी ऑक्सीडेंट्स गुणधर्म देखील असतात. जे तुमच्या त्वचेला फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.

पपईचा ज्यूस –
पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम्स असते. जे त्वचेतील अशुद्धता काढून टाकण्यास मदत करते आणि स्वच्छ, चमकदार त्वचा प्राप्त करण्यास मदत करते. पपईचा ज्यूस नियमितपणे पिणे मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी फायदेशीर आहे.

कोरफडीच्या ज्यूस –
कोरफडीच्या ज्यूसमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. सामान्यतः मुली त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी त्वचेवर कोरफड जेलचा वापर करतात. कोरफडमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. जे तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामध्ये ऑक्सिनसारखे हार्मोन आढळते जे त्वचेला चमकदार बनविण्यास मदत करते. त्यामुळे कोरफडीचा ज्यूस त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

 

 

 


हेही वाचा : सुरकुत्या, फाइन लाईन कमी करण्यासाठी डाळिंबाची साल उपयुक्त

- Advertisment -

Manini