घरताज्या घडामोडीSanjay Raut : राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली तर..., विरोधकांच्या इशाऱ्याला राऊतांचे...

Sanjay Raut : राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली तर…, विरोधकांच्या इशाऱ्याला राऊतांचे उत्तर; म्हणाले….

Subscribe

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. आज (13 मार्च) ही यात्रा धुळे आणि मालेगावचा टप्पा पार करणार आहे. त्यानंतर मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य सभेने समारोप होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 17 मार्चला होणाऱ्या सभेत राहुल गांधी भाष्य करणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. आज (13 मार्च) ही यात्रा धुळे आणि मालेगावचा टप्पा पार करणार आहे. त्यानंतर मुंबईत भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य सभेने समारोप होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे 17 मार्चला होणाऱ्या सभेत राहुल गांधी भाष्य करणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. काँग्रेसच्या मंचावर उद्धव ठाकरे उपस्थिती राहणार या वृत्तानंतर विरोधकांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. (sanjay raut slams oppositions on rahul gandhi bharat jodo nyay yatra in nashik)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे आज नाशिकमध्ये असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना ठाकरेंवरील टीकेवर प्रत्युत्तर दिले. “चांदवडच्या सभेसाठी मी नाशिकमध्ये आलो आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्या नाशिकमध्ये राहुल गांधी येत असून, त्यांचे शिवसेनेकडून जोरदार स्वागत व्हावे. नाशिक ही वीर सावकरांची भूमी आहे. नाशिकमधील शालिमार चौक येथे आमचे कार्यकर्ते उभे राहतील आणि राहुल गांधी यांचे जोरदार स्वागत करतील. त्यानंतर त्यांच्या यात्रेतही सहभागी होतीस, असा कार्यक्रम ठरलेला आहे. भारत जोडो न्याय यात्रा हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. काँग्रेसने देशभरात भारत जोडो न्याय यात्रा चालवली. अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत सामील झालो. ते आता महाराष्ट्रात येत असून त्यांच्या यात्रेचे स्वागत करणे आमचं काम आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

भाजपवर संजय राऊतांचा हल्लाबोल

“या देशाचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. या देशात लोकशाही आहे. एकमेकांवर आपण टीका करत असतो. पण जेव्हा देश, संविधान आणि लोकशाही संकटात असते, तेव्हा मतभेद विसरून एकत्र यावे लागते. त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्या भाजपमधील लोकांना मी सांगू इच्छितो की, 1978 साली मतभिन्नता असताना आपण सगळे एकत्र का आला होता? आणि जनता पक्षात का सहभागी झाला होता? कारण तेव्हा असे वाटत होते की, देश, संविधान आणि लोकशाही संकटात आहे आणि आताही संकटात आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 17 मार्च रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेत उपस्थित राहतील. महाविकास आघाडी म्हणून ती सभा होणार आहे”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जेव्हा महाराष्ट्रात आले होते. तेव्हा त्यांनी सावरकरांवर टीका केली होती. असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर “सावरकर हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा असून काँग्रेससाठीही महत्त्वाचा आहे. त्या विषयावर राहुल गांधींनी आपलं मत त्यावर व्यक्त केलेले नाही”, असे उत्तर संजय राऊत यांनी दिले.

- Advertisement -

हेही वाचा – C VOTER : दक्षिणेत काँग्रेस मजबूत, पण या राज्यांत भाजप अग्रेसर; सी वोटर पोलचा निष्कर्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -