Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenतुम्ही देखील रात्रीचे उरलेले शिळे अन्न खाता? मग आधी 'हे' वाचा

तुम्ही देखील रात्रीचे उरलेले शिळे अन्न खाता? मग आधी ‘हे’ वाचा

Subscribe

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे जेवणाखाण्याकडे दुर्लक्ष होते.शिवाय घरातील गृहिणीदेखील जॉब करणारी असेल तर ताजे जेवण बनवण्यासाठी अधिक वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकदा रात्रीचे उरलेले जेवण घरातील सर्वजण खातात. परंतु रात्रीचे शिळे अन्न रोज खाणं शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकते. अनेकदा शिळ्या पदार्थांमुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.

‘हे’ शिळे पदार्थ कधीही खाऊ नये

  • बटाटा

Batata Harra ➤ Spicy Roasted Potatoes | Gourmandelle

- Advertisement -

 

अनेक जण बटाटा आवडीने खातात. त्यात जर बटाट्याची भाजी, भजी असे काही बट्यापासून बनवलेले स्पेशल पदार्थ असतील तर दुसऱ्या दिवशीही खाण्याची तयारी असते. मात्र डॉक्टरांच्या मते बटाटे शिजल्यानंतर बराच वेळ थंड होण्यासाठी ठेवले तर त्याच क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या जीवाणुची निर्मिती होते. हा जीवाणु बोटुलिझम आजाराला निमंत्रण देतो. त्यामुळे अनेकांना दृष्टीदोष, तोंड कोरडे होणे व श्वास घेताना त्रास होणे. असे अनेक आजार उद्भवू शकतात. या आजाराचा लहान मुलांना होणाचे प्रमाण अधिक आहे.

- Advertisement -
  • चिकन

Chiken Stock Photos, Royalty Free Chiken Images | Depositphotosनॉनव्हेज खाण्याची आवड असणाऱ्यांना चिकन खायला खूप आवडते. अनेकदा काहीजण चिकन खोडे कच्चे ठेवतात. यामुळे देखील अनेक आजार होऊ शकतात.  त्यामुळे धोका टाळण्यासाठी किचन चांगले शिजू घ्यावे. बनवलेले चिकन जास्तीत जास्त 24 तासाच्या आत खावे. सतत शिळे चिकन खाऊ नये.

 

  • तेलकट पदार्थ

FRY PAPAD - Platezz

 

पापड, नळ्या, कुरडया, पुऱ्या, वडे हे पदार्थ जेवणाची चव वाढवतात. परंतु हे तेलकट पदार्थ एकदाच गरम करुन खाणे शरीरास फलदायी आहे. कारण हे पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांच्यात हानिकारक रसायने तयार होतात. जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. जर तुम्हाला ते खायचेच असेल तर एकतर ते गरम न करताच खावे किंवा मंद आचेवर गरम करावे.

  • भात

Basic Stovetop Rice Recipe - NYT Cooking

 

भाताशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. परंतु हाच भात जर रात्रीचा असेल किंवा शिजवून बराच वेळ झाला असेल तर त्यात वेगळ्याप्रकराचा वास येतो. तसेच बऱ्याच काळासाठी रुम टेम्प्रेचरमध्ये राहिल्यास त्यात बॅरिलस सेरियस जीवाणू वाढू लागतो. अनेकदा शिळ्या भातामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. त्यामुळे शिळा भात खाणे शक्यतो टाळा.

  • अंडी

Fried egg - Wikipedia

 

अनेकजण सकाळी नास्ता, जेवनातही अंडी खाणे पसंत करतात. परंतु अंड्यामध्येही साल्मोनेला जीवाणू आढळतो. त्यामुळे कच्चे किंवा अर्धवट शिजलेले अंडी खाणे टाळावेत. कच्चे, अर्धवट शिजवलेली अंडे खाल्ल्याने ताप, पोटाचा त्रास, अतिसारसारखे आजार होऊ शकतात. काही जण कच्ची अंडी खाणे पसंत करतात परंतु असे करणे एक प्रकारे आपल्या शरीरासाठी अपायकारकचं आहे.

  • सीफूड

12 best seafood restaurants in India—across Mumbai, Goa, Bengaluru, Kolkata  and Delhi | Vogue India

 

मटण, अंडीसह मासे हा देखील नॉनव्हेजिटेरीन खवय्यांचा आवडता पदार्थ. परंतु खराब सीफूड (मासे) खाद्य खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, उच्च तापमानात वारंवार सीफूड गरम केल्याने त्यात बॅक्टेरिया उद्भवू शकतात. त्यामुळे दोन तासांपेक्षा जास्त वेळ सीफूड बाहेर ठेवू नये.

 


हेही वाचा :

अनेक आजारांवर गुणकारी आहे वेलची

- Advertisment -

Manini