Wednesday, October 4, 2023
घर मानिनी Health दात दुखीवर करा 'हे' घरगुती उपाय

दात दुखीवर करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

दात दुखू लागल्यास डोकं, हिरड्या भयंकर दुखतात. यामुळे संपूर्ण दिवसभर अस्थावस्थ झाल्यासारखे होत राहते. अशी स्थिती होते की, काय करावे आणि काय करू नये. परंतु तुम्ही पुढील काही घरगुती उपायांनी दात दुखीच्या समस्येपासून दूर राहू शकता. (Tooth pain home remedies)

-मीठाच्या पाण्याने चुळ भरा

- Advertisement -


दात दुखीची समस्या निर्माण झाल्यास तुम्ही मीठाच्या पाण्याने चुळ भरू शकता. यामुळे दुखण्यापासून आराम मिळू शकतो. यासाठी एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेत त्यात अर्धा चमचा टेबल सॉल्ट टाकू शकता. या पाण्याने तुम्ही चुळ भरा. असे करताना लक्षात ठेवा की, पाणी पिऊ नका.

-आइस पॅक

- Advertisement -


जर तुमचा चेहरा दात दुखीमुळे सूजला असेल तर त्यावर आइस पॅक लावा. यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होईल. जर तुमचे दात तुटला असेल तर हिरड्यांना सूज येण्यास खुप दुखते. सूज येण्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या दाताच्या मुळाजवळ फोड आलेला असू शकतो.

-लवंगाचे तेल


लवंगाचे तेलचा वापर करुन तुम्ही दात दुखीच्या समस्येपासून दूर राहू शकता. यासाठी कॉटनवर लवंगाचे तेल लावा आणि दुखत असेल तेथे लावा.

-पेपरमिंट किंवा पुदीनाची चहा


एक थंड पेपरमिंट टी बॅग किंवा पुदीन्याच्या चहाने दुखत असलेल्या ठिकाणी वापरू शकता. पुदीन्याची चहा बनवण्यासाठी एका कपमध्ये पुदीन्याची पाने टाका आणि उकळवा. ही चहा तुम्ही पिऊ शकता.


हेही वाचा- वारंवार तुम्हाला तोंड येतं का ? तर मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता

- Advertisment -

Manini