Sunday, April 28, 2024
घरमानिनीTravel Tip : ट्रॅव्हल पॅकेज बुक करताना या गोष्टी लक्षात घ्या

Travel Tip : ट्रॅव्हल पॅकेज बुक करताना या गोष्टी लक्षात घ्या

Subscribe

पिकनिकचे आयोजन करताना अनेक जण ट्रॅव्हल पॅकेज बुक करतात. कुटुंबासमवेत ट्रिप असो वा हनिमून ट्रिप प्लॅन करताना ट्रॅव्हल पॅकेज बुकिंगला प्राधान्य देण्यात येते, कारण प्रवासाशी संबंधित सर्व तयारीचा समावेश या पॅकेजमध्ये करण्यात आलेला असतो. यामध्ये रेल्वे किंवा विमानाच्या तिकिटांपासून ते राहण्याची सर्व तयारी ट्रॅव्हल एजंटकडून केली जाते. यात प्रवाशाला फक्त फिरावे लागते, त्यांना खाण्याची राहण्याची चिंता करावी लागत नाही. पॅकेजमध्ये शहरातील प्रसिद्ध ठिकाणी नेण्याची जबाबदारीही ट्रॅव्हल एंजटची असते. पण, अनेकदा बुक करताना लोक चुका करतात. पॅकेजमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांकडे ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे ज्यांना अधिक खर्च करावा लागतो.

ट्रॅव्हल पॅकेज बुक करताना या गोष्टी लक्षात घ्या

- Advertisement -

सुविधांची माहिती घेणे – जर तुम्ही पॅकेजमधून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी पॅकेजमधील सुविधा लक्षात घ्या. यामध्ये कोणत्या गोष्टी स्वतंत्रपणे घाव्या लागतील हे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही कुठे फिरणार आहात, या पॅकेजच्या माध्यमातून प्रसिद्ध ठिकाणाला भेट देण्याची संधी मिळत आहे का, याकडेही लक्ष द्यायला हवे.

- Advertisement -

पर्यटनस्थळांची माहिती घ्यायला हवी – पॅकेजमध्ये कोणती पर्यटनस्थळे दाखवली जातील आणि त्या ठिकाणची एंट्री फिस वेगळी भरावी लागेल का हे लक्षात घ्यायला हवे. प्रत्यक्षात अशी अनेक ठिकाणे असतात ज्यांची एट्री फी स्वतंत्रपणे भरावी लागते. पॅकेजमध्ये विमान प्रवास असल्यास विमान थेट किंवा कनेक्टिंग आहे का नाही हे आधी तपासून घ्या .

विमानाचे तिकीट – विमानाचे तिकीट इ-तिकिटच्या स्वरूपात असते. अनेकदा ट्रॅव्हल्स एजंट तिकीटाची फसवणूक करण्याचा प्रयन्त करतात. पर्यटकांना फसविण्यासाठी ते जुन्या तिकिटांची तारीख बदलतात. त्यामुळे इ-तिकीट मिळाल्यानंतर पर्यटकांनी स्वतः संकेतस्थळावर जाऊन एकदा आपले तिकीट अवश्य चेक करावे. असे केल्याने त्यावरील पीएनआर क्रमांकांच्या मदतीने त्यांचे तिकीट खरोखरच बुक झाले का नाही ते लक्षात येते.

मान्यताप्राप्त ट्रॅव्हल्स कंपनीची निवड – बुकिंग करताना मान्यताप्राप्त ट्रॅव्हल्स कंपनीकडे ट्रिप बुक करा. आपल्याला ऑनलाईन जाहिराती स्वस्तात प्रवास करण्यास भाग पडतात. त्यामुळे तपासूनच आणि माहिती घेऊनच बुकिंग करा.

जर ट्रॅव्हल कंपनीने ट्रिप रद्द करून भरलेली रक्कम परत करण्यास नकार दिल्यास तुम्ही ग्राहक मंचात तक्रार करू शकता.

 

 

 


हेही वाचा :  रेल्वेत प्रवास करताना आजारी पडलात तर अशी मिळवा मदत

 

- Advertisment -

Manini