घरलाईफस्टाईलग्रुप टूरला जाताय मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

ग्रुप टूरला जाताय मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

ग्रुप टूरला जाण्याची एक वेगळीच मज्जा असते. यासाठी अनेक प्लॅनिंग-प्लॉटिंग केले जाते. पण कितीही प्लॅनिंग केले तरी अचानक काहीतरी समस्या या उदभवतातच. काही समस्यांवर तर अचानकपणे सोल्युशनसुद्धा निघत नाही. अशावेळी नेमकं काय करायचे हे अनेकांना समजत नाही. त्यामुळेच ग्रुप टूरला जाण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे.

प्लॅनींग करणे गरजेचे

- Advertisement -

Himachal Group Tour जेव्हा तुम्ही ग्रुप टूरला जाता तेव्हा सर्वात महत्वाचे म्हणजे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. ग्रुप टूरला जाण्याआधी तुम्हाला हॉटेल बुकिंग करणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्ही कोणत्या वाहनांनी जाणार आहात त्यांची वेळ अशा अनेक गोष्टी आधीच लक्षात असणे गरजेचे आहे. अनेकदा ग्रुप टूरमध्ये सवलतही मिळते.

बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका
ग्रुप टूर दरम्यान एकमेकांशी संवाद असणे गरजेचे आहे. कारण अशाने मिस कम्युनिकेशन होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी तुम्ही खास त्या टूरसाठी एक व्हाट्सअँप ग्रुप तयार करू शकता. ज्याने तुम्हाला ट्रॅव्हल्सही संबधित काही गोष्टी असतील त्या एकेमकांशी बोलता येतील. जसे की हॉटेल बुकिंग करताना आयडी कार्ड शेअर करणे, ट्रॅव्हलविषयी डॉक्युमेंट्स देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

विमा असणे आवश्यक
कोणताही प्रवास करायचा असेल तर भले तो लांबचा असो की जवळचा यासाठी विमा असणे गरजेचे आहे. कारण कधी काय होईल हे सांगता येणार नाही. कधी अपघात झाल्यास तुमचा आधीच ट्रॅव्हल विमा असेल तर ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. प्रवास करताना प्लॅन रद्द झाल्यास किंवा सामान ठरविल्यास अशावेळी तुमच्या कडे आधीच विमा असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. याव्यतिरिक्त विमा तुम्हाला टेन्शन फ्री ट्रॅव्हल करण्यास उपयोगी ठरेल.

खर्चाचा मागोवा ठेवा
जेव्हा तुम्ही ग्रुप टूरला जाता तेव्हा कोणीही कसाही खर्च करतो आणि टूरचे बजेट बिघडते. अशावेळी बजेट तर बिघडतेच पण नंतर पैशांचा हिशोब ठेवणे कठीण होऊन जाते. त्यामुळे टूरला जाताना ग्रुपमधील कोणी एकाने तरी खर्चाचा मागवा ठेवणे आवश्यक आहे.

 


हेही वाचा;

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -