Wednesday, May 1, 2024
घरमानिनीTravel Tips : उन्हाळ्यात ट्रॅव्हल करताना या गोष्टींची काळजी घ्या

Travel Tips : उन्हाळ्यात ट्रॅव्हल करताना या गोष्टींची काळजी घ्या

Subscribe

उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की, बरेच जणांचे ट्रिप प्लॅनिंग सुरु होते. पण, अनेकदा ट्रॅव्हल करताना लोक आजारी पडतात. अशाने संपूर्ण ट्रीपची मज्जाच निघून जाते. इतक्या आनंदात आणि उत्साहाने तयारी केलेली ट्रिप नकोशी वाटायला लागते. जर तुम्हीही उन्हाळ्यात प्रवास करण्याचा बेत आखत असाल आणि आरोग्याची काळजी करत असाल तर पुढील टिप्स नक्की फॉलो करा. यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही आणि प्रवासाचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे संपूर्ण ट्रिप एन्जॉय करू शकाल.

ट्रॅव्हल करताना पुढील गोष्टी लक्षात घ्या –

- Advertisement -

प्रवासादरम्यान, कधीही जड आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका., कारण ते पचायला जड असतात. अशा पदार्थांचे पचन व्हायला वेळ लागतो. प्रवासादरम्यान आपण एकाच जागी बसून प्रवास करतो असणे ऍसिडिटी आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उदभवतात. यासह जास्त मसालेदार पदार्थ खाल्याने शरीराचे तापमान वाढू शकते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते.

उन्हाळ्यात प्रवास करताना काकडी, टरबूज, कलिंगड अशी ताजी फळे खावीत, ती जास्त जड नसतात आणि त्यांनी बराच वेळ भूक लागत नाही. प्रवासात ही फळे खाल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

- Advertisement -

खाण्यासोबतच प्रवास करताना कपड्यांची विशेष काळजी घ्यावी. प्रवास करताना कधीही टाईट कपडे घालू नये, उष्णतेमुळे ऍलर्जी आणि पुरळ उठू शकते. तसेच अशा कपड्यानी कम्फर्टेबल वाटत नाही. प्रवास करताना कायम सुती आणि हलके कपडेच वापरावेत.

खाण्यासोबतच प्रवास करताना जास्त प्रमाणात लिक्विड सुद्धा प्यावे. यासाठी दर काही मिनिटांनी तुम्ही पाणी पिऊ शकता. पाण्याशिवाय नारळाचे पाणी, फळांचा रस सुद्धा उत्तम पर्याय आहेत. यामुळे उन्हाळ्यात तापमान वाढले तरी तुमचे शरीर डिहायड्रेट होणार नाही आणि एनर्जी टिकून राहील.

चहा किंवा कॉफीचे सेवन करू नका. यात कॅफीनचे प्रमाण जास्त असते, यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो. तर कॅफीनचे सेवन तहानही वाढवते हेही लक्षात घ्या.

अनेकजणांना सवय असते की, प्रवासादरम्यान ट्रेनमधील किंवा स्ट्रीटफूड खाण्याची. पण ते शरीरासाठी हायजेनिक नसते. अशा दूषित अन्नामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. यासाठी घरातून प्रवासात टिकणारे पदार्थ किंवा हलके फुलके,पचायला जड नसणारे पदार्थ खावेत. शक्यतो ट्रेनचे जेवण टाळावे.

 

 

 

 


हेही पहा : Periods मध्ये प्रवास करताय?

मग लक्षात ठेवा या गोष्टी 

- Advertisment -

Manini