घरदेश-विदेशPM Modi : माझ्याबद्दल 104 वेळा अपशब्द वापरला, पण...; पंतप्रधान मोदींचा संजय...

PM Modi : माझ्याबद्दल 104 वेळा अपशब्द वापरला, पण…; पंतप्रधान मोदींचा संजय राऊतांवर पलटवार

Subscribe

नवी दिल्ली : गुजरात या जन्मस्थळावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मोगल बादशहा औरंगजेबशी केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. विरोधकांनी औरंगजेबचा उल्लेख करत माझ्याबद्दल 104 वेळा अपशब्द वापरला आहे. पण त्याने काहीही होणार नाही. कारण लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Chitra Wagh : गुजरातने मोदींसारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिलाय, चित्रा वाघांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

- Advertisement -

येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. सध्या निवडणुकीचा माहोल आहे. चर्चा, आरोप-प्रत्यारोप वातावरण आहे. हेच तर लोकशाहीचे सौंदर्य आहे, असे मी मानतो. देशातही निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत आणि आमच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांचा आराखडाही तयार करत आहोत. तर दुसरीकडे, आमचे विरोधकही नवनवे विक्रम करत आहेत. आता त्यांनीच 104व्यांदा मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे. माझा औरंगजेब असा उल्लेख केला आणि माझा शिरच्छेद करण्याची घोषणा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

आज जेव्हा गरीब मला आशीर्वाद देतात तर, विरोधक मनातल्या मनात मला शिव्या देतात. ही लोक त्या गरीब लोकांबरोबर मलाही शिव्या देतात. पण त्या शिव्यांमुळे मला काही फरक पडणार नाही, कारण जनता आमच्यासोबत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Congress: बँक खाती गोठवण्याचा कट, सरकारला आम्हाला लाचार बनवायचंय; काँग्रेसचा हल्ला

काय म्हणाले होते राऊत?

बुलढाणा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. औरंगजेबचा जन्म नरेंद्र मोदी यांच्या गावाजवळ झाला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची विचारसरणी औरंगजेबासारखी आहे. या विचारसरणीतून महाराष्ट्रावर हल्ले होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

हेही वाचा – Arvind Kejriwal: केजरीवालांना अटकेची भीती; ईडीकडून दंडात्मक कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयात अर्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -