Friday, May 3, 2024
घरमानिनीHealthवजन वाढवायचंय? मग फॉलो करा 'हा' डाएट प्लॅन

वजन वाढवायचंय? मग फॉलो करा ‘हा’ डाएट प्लॅन

Subscribe

वजन वाढवण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. मात्र, अनेकदा चुकीच्या पद्धतींचा वापर केल्याने शरीरावर त्याचा दुष्परिणाम होतो. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण योग्य असायला हवे. त्यासाठी खालील डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करु शकता.

वजन वाढवण्यासाठी योग्य डाएट

  • ब्रेकफास्ट

Perfect Soft-Boiled Egg Recipe

- Advertisement -

सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये एक ग्लास कोमट दूधासोबत एक प्लेट पोहे किंवा उपमा, दोन अंडी आम्लेट किंवा दोन उकडलेली अंडी, ब्राऊन ब्रेड, ओट्स यांपैकी काहीही खावं. यासोबतच तुम्ही गूळ, शेंगदाणे, काजू, बदाम या ड्रायफ्रुट्सचा देखील समावेश करु शकता.

  • दुपारचे जेवण

Indian Diet Plan for Weight Loss without Restricting your Diet

- Advertisement -

 

दुपारचे जेवण हे सर्वसमावेशक असावे. यात दही एक वाटी, 2-3 चपात्या, एक वाटी भात, हिरव्या भाज्या, डाळ, सलाड असावं. तसेच कधी-कधी कडधान्य, मासे देखील असावे.

  • संध्याकाळचा नाश्ता

French Toast with Fruit Recipe and Nutrition - Eat This Much

दुपारचे जेवण योग्य वेळेत घेतल्यास संध्याकाळच्या सुमारास थोडीफार भूक लागते. अशावेळी जड पदार्थ खाण्यापेक्षा दोन स्लाईस ब्राऊन ब्रेड तसेच एक ग्लास बनाना शेक घेऊ शकता. यासोबत तुम्ही फळांचा देखील समावेश करु शकता.

रात्रीचे जेवणNepali Dishes You Need to Try at Least Once - OMG Nepal

रात्रीचे जेवण फार कमी घ्यावे. रात्रीच्या जेवणात 1 भाकरी, सुकी भाजी, डाळ, भात हे खावं. रात्री जेवल्यानंतर 15-20 मिनिटांनंतर मीठ आणि साखरेशिवाय कोमट लिंबूपाणी प्यावे. तसेच जेवल्यानंतर दोन ते अडीच तासांनी झोपावे. कारण या काळात जेवण चांगले पचते. तसेच पचनसंबंधी समस्या दूर होतात.


हेही वाचा :

- Advertisment -

Manini