उन्हाळ्यामध्ये उत्तम आरोग्यासाठी आणि डिहायड्रेशनपासून सुटका करून घेण्यासाठी कलिंगड खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कलिंगड हे फळ लोकप्रिय आहे. कलिंगड गोड आणि थंड असल्याने अनेकजण उन्हाळ्यात कलिंगड खाण्याला प्राधान्य देतात. कलिंगडासोबतच त्याच्या बिया देखील तितक्याच फायदेशीर आहेत. त्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, मॅग्नेशियम हे पोषक घटक आढळतात. ही पोषक तत्वांमुळे शरीरातील समस्या दूर होतात.
कलिंगडाच्या बियांचे फायदे
- रोगप्रतिकारकशक्ती वाढते
कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्याने रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. शरीरात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात राहण्यासाठी कलिंगडाच्या बियांचे आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.
- दृष्टी सुधारणे
कलिंगडाच्या बिया डोळ्यांसाठी गुणकारी आहेत. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. कलिंगडाच्या बियांमुळे मोतीबिंदूचा धोकाही कमी होतो. याबरोबरच डोळ्यांची दृष्टी सुरक्षित राहते.
- रक्तदाबाचा धोका कमी
कलिंगडाच्या बिया पोटॅशियमयुक्त आहेत. रक्तदाब कमी करण्यासाठी पोटॅशियम युक्त आहार घेतला पाहिजे.
- गरोदरपणामध्ये फायदेशीर
कलिंगडाच्या बिया फोलेटसाठी उत्तम असल्याने ते शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकतो. यामुळे गरोदर महिलांमध्ये पाणी टिकून राहण्याची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी कलिंगडाच्या बिया फायदेशीर ठरतात. मात्र, गरोदरपणात तज्ज्ञांच्या सल्ल्या घेऊनच याचे सेवन करा.
हेही वाचा :