घरताज्या घडामोडीManoj Jarange : मला तडीपार करण्याचा प्रयत्न, पण गृहमंत्रीसाहेब..., जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Manoj Jarange : मला तडीपार करण्याचा प्रयत्न, पण गृहमंत्रीसाहेब…, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Subscribe

'माझ्याविरोधात आणखी 10 ते 15 केसेस करायच्या आणि मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या. गृहमंत्रीसाहेब स्वप्न बघायचे कमी करा. तडीपार करण्याचा प्रयत्न करायचा, क्लिप व्हायरल करायची', असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत.

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत. मागील काही दिवसांपूर्वी फडणवीसांना माझ्यासोबत बोलायचं नव्हतं, पण पहाटे तीन वाजता त्यांनी मला फोन केला होता, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर आता ‘माझ्याविरोधात आणखी 10 ते 15 केसेस करायच्या आणि मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या. गृहमंत्रीसाहेब स्वप्न बघायचे कमी करा. तडीपार करण्याचा प्रयत्न करायचा, क्लिप व्हायरल करायची’, असं म्हणत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत. (manoj jarange patil big allegation on cm eknath shinde and dcm devendra fadnavis)

मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हे काहीशा प्रमाणात शांत झाले आहे. मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. ज्यामुळे आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासहित अनेकांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, असे असतानाही मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधणे सोडलेले नाही.

- Advertisement -

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मला रात्री माहिती मिळाली की माझ्याविरोधात आणखी 10 ते 15 केसेस करायच्या आणि मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या. गृहमंत्रीसाहेब स्वप्न बघायचे कमी करा. तडीपार करण्याचा प्रयत्न करायचा. क्लिप व्हायरल करायची. मराठा समाज विरोधात गेला. आता इतर समाजही विरोधात चालला आहे. गृहमंत्र्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की, ती म्हणजे तुम्ही जेवढे माझ्या विरोधात जाल, तेवढी लोक माझ्या बाजूने उभी राहतील. मला पाठिंबा देतील. एका बाजूने म्हणायचे की, गुन्हे मागे घेतो आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा गुन्हे दाखल करायचे. परळीसारख्या ठिकाणी 90 हजार ते 1 लाख लोक सभेला होते. यावरून त्यांच्या लक्षात आले पाहिजे. हा तुमच्यासाठी खूप मोठा संकेत आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी. गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणे कामाचे नाही”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली.

याशिवाय, “गृहमंत्री स्वतःला सर्वोच्च न्यायालयाच्या वर समजत असतील. ही सत्ता मराठ्यांनी दिली असली तरी मराठ्यांवरच अन्याय करू शकतो, असे त्यांना वाटत असेल. या सत्तेचा वापर करून मराठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. देशभरात मोठ्या जातींना पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न यांनी केला आहे. पण जर सर्व मोठ्या जाती एकत्र आल्या तर यांचा राजकीय सुपडा साफ होईल. 24 तारखेला निर्णायक भूमिका घेणार आहे. 15 ते 16 विषय आहेत. गेल्या 70 वर्षांतील सगळ्या गोष्टी असणार आहेत. आतापर्यंत कुणी ऐकले नसतील, माहिती नसतील, असे विषय आहेत”, असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Manoj Jarange : पहाटे तीन वाजता फोन खणखणला आणि…; मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -