Friday, February 23, 2024
घरमानिनीHealthफिटनेस मधील Biohacking म्हणजे काय?

फिटनेस मधील Biohacking म्हणजे काय?

Subscribe

फिटनेस मधील बायोहॅकिंग म्हणजे नमके काय हे फार कमी लोकांना माहिती नाही. खरंतर बायोहॅकिंग म्हणजे आपल्या आरोग्याला आणि आयुष्याला समजून घेणे. या प्रक्रियेत आपली शारिरीक आणि मानसिक कार्यप्रणाली डिकोड करुन जीवनशैलीमध्ये बदल केला जाऊ शकतो. बायोहॅकिंगचा सर्वाधिक महत्वाचा हिस्सा म्हणजे तंत्रज्ञान. आज अनेक डिवाइस वापरले जातात, जे बायोहॅकिंगचे काम सोप्पे करते. बायोहॅकिंगचे दोन उद्देश असतात. पहिला म्हणजे आरोग्याच्या त्रुटी जाणून घेणे आणि ते सुधारणे. दुसरा म्हणजे आयुष्याच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आणि दीर्घायुष्य जगणे. (biohacking in fitness)

तन-मनाची भाषा
काही लोकांना झोप तेव्हाच येते जेव्हा खोलीत अंधार होतो. सकाळी बेडवर चहा मिळाल्यानंतर काहींना झोप पूर्ण झाल्यासारखे होते. तसेच कोमट पाण्याच्या सेवनाने स्नान करणे बहुतांश लोकांना आवडते. पण व्यायाम करणे जमत नाही. खरंतर हा अनुभव तुम्हाला तुमच्या तन-मनाची भाषा समजण्यास मदत करते. परंतु काही लोकांचे मनावर कंट्रोल नसते आणि काहींना शरिरात काय बदल होतायत हे सुद्धा कळत नाही. अशातच जर तुम्हाला बायोहॅकर व्हायचे असेल तर पहिली अट अशी की, शरिर आणि मनावर होणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल नेहमीच जागृत राहणे. केवळ माहिती घेऊन आपल्या आऱोग्याबद्दल हवा तसा बदल करता येत नाही.

- Advertisement -

जर तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची असेल त्यामध्ये काही वाईट नाही. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर खाण्यापिण्यात बदल करा, उपवास करा. अशातच तुम्ही दहा तास किंवा चार-पाच तास काहीही न खाण्याचा प्रयत्न केला तर हे योग्य नव्हे. यामुळे शरिराची क्षमता पाहूनच बायोहॅकचा पर्याय निवडावा.

- Advertisement -

बायोहॅकचे फायदे
-शारिरीक आणि मानसिक क्षमता उत्तम होतो
-शरिरातील त्रुटी आणि मजबूत बाजू समजते
-पैसे आणि वेळेची बचत होते
-लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर आत्मविश्वास ही वाढतो

कशी सुरुवात कराल?
-पहिला टप्पा म्हणजे आपल्या शरिराची, मनाची स्थिती जाणून घेणे
-जर वजन कमी करणे किंवा शरिराची क्षमता वाढवणे, पुरेशी झोप घेण्यासाठी जे त्यासाठी योग्य पर्याय आहेत ते निवडावेत
-सर्वात म्हणजे घाई करु नका. जेव्हा तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहचता तेव्हा याची चिंता करु नका

बायोहॅकिंगचे सामान्य प्रकार
-इंटरमिटेंट फास्टिंग
एका मर्यादित काळापर्यंत उपवास करणे. जसे की, 8 तास किंवा 16 तास. याच दरम्यान काही खायचे-प्यायचे नाही. उर्वरित काळात खाताना सुद्धा खाण्यापिण्यात ही संतुलन असावे. यामुळे वजन कमी होते आणि रक्तदाब कमी करण्यास ही मदत होते.

-थंड पाणी
थंड पाण्यात स्विमिंग करणे किंवा शॉवर घेतल्याने हार्टची कार्यप्रणाली सुरळीत होणे आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी फार मदत होते. दीर्घकाळ व्यायाम केल्यानंतर स्नायूंना आराम देण्यासाठी थंड पाण्याची थेरपी फायदेशीर ठरु शकते.

-योगा
भावनात्मक संतुलनासाठी, विचारांमध्ये स्पष्टता येण्यासाठी तुम्ही योगा, मेडिटेशन करु शकता. यामुळे तुमचे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.


हेही वाचा- मिनी वर्कआऊट म्हणजे काय?

- Advertisment -

Manini