घरक्रीडाICC Cricket WC 2023 : विराट आणि सचिनबाबत सेहवागचे मोठे वक्तव्य, धोनीचाही...

ICC Cricket WC 2023 : विराट आणि सचिनबाबत सेहवागचे मोठे वक्तव्य, धोनीचाही केला उल्लेख

Subscribe

भारतात होणाऱ्या विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरूवात होणार असून 8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना पार पडणार आहे. वेळापत्रकाच्या अनावरणाला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग उपस्थित होता. यावेळी हॉटस्टारशी त्याने संवाद साधला. त्यावेळी त्याने विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघातील प्रत्येकाने विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायला हवा. विराट कोहली हा ग्रेट खेळाडू तर आहेच. त्याशिवाय तो चांगला माणूसही आहे. तो नेहमीच इतर खेळांडूना मदत करण्यासाठी पुढे येतो. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यामध्ये खूप समानता आहे. मोठ्या स्पर्धेत विराट कोहली इतरांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतो, असे वीरेंद्र सेहवाग म्हणाला.

- Advertisement -

2011 च्या विश्वचषक सामन्यादरम्यान महेंद्रसिंह धोनीने खिचडी खाल्ली होती. एखाद्या मोठ्या स्पर्धेवेळी प्रत्येकजण अंधश्रद्धाळू (superstitious)असतो. धोनीनेही 2011 मध्ये फक्त खिचडी खाल्ली होती, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. तसेच त्याने सेमीफायनलचे चार संघ निवडले. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघाचा समावेश आहे.

- Advertisement -

विश्वचषकातील भारताचे सामने :

8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर- 2, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर- 1, बेंगळुरू


हेही वाचा : ODI World Cup 2023 Schedule : एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक सामना कधी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -