Friday, May 17, 2024
घरमानिनीHealthडाएट कोणी कराव? कोणत्या वयात करावं?

डाएट कोणी कराव? कोणत्या वयात करावं?

Subscribe

एकदा चाळीशी ओलांडली की डाएट करण्याचे वय संपलं. अशी अनेकांची धारणा असते. डाएट हे फक्त विशी -पंचविशीमधील तरुणाईचे चोचले आहेत आणि चाळिशीनंतर वजन वाढणारचं. त्यामुळे खाऊन पिऊन मस्त राहावे. असं अनेकजण म्हणतात. परंतु वयाच्या कोणत्याही टप्प्यात तुम्ही डाएट करू शकता. जरी तुम्ही 13-14 वर्षांचे असाल किंवा अगदी 60 वय पार केलेले असले तरीही तुम्ही डाएट करु शकता.

तुमच्या डाएट करण्याचे योग्य वय हे तुमचे आरोग्य, जीवनशैली आणि विशिष्ट उद्दिष्टे यासारख्या वैयक्तिक घटकांवर अवलंबून असते. डाएट जेवढ्या लवकर तुम्ही सुरु करणार तेवढे जास्त चांगले मानले जाते.

- Advertisement -

Must Have : Nutritious Food For Elderly-healthkart blog

  • डाएट म्हणजे तुमच्या आयुष्यात आणि जेवणात पूर्णपणे बदल घडवणे नाही तर तुमच्या रोजच्या खाण्यात ज्या छोट्या-छोट्या चुकीच्या सवयी आहेत त्या बदलणे. या छोट्या बदलांनी तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडू शकतो.
  • अगदी तुमच्या रोजच्या जेवणातील जास्त मीठ, साखर, तेल असलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे आणि काही चांगले पोषक तत्वे असलेले अन्न सामाविष्ट करणे जसे की वेगवेगळ्या रंगाची फळे, हिरव्या पालेभाज्या, धान्य, कडधान्य, काही वेगवेगळ्या प्रक्राच्या डाळी, उसळी, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि सी फूड, यांचा आपल्या जेवणातला समावेश असे छोटे-छोटे बदल तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात करु शकता.
  • यामुळे महिलांमध्ये असलेले थायरॉईड ,पीसीओडी, पीसीओएस असे आजार आणि आजकाल सर्रास सर्वांमध्येच आढळणारे क्लोरेस्ट्रॉल लेव्हल, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हे सर्व त्रास नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारते जे तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक सारख्या गोष्टींपासून वाचवते.

How your Diet Should Change As You Age | SouthCoast Health

- Advertisement -
  • एका रिसर्चनुसार “जर वीस वर्षाच्या मुलाने रोजच्या जेवणात चांगले बदल केले तर त्याचे आयुष्य 11 ते 13 वर्षापर्यंत वाढू शकतं, 60 वर्षाच्या व्यक्तीने केले तर 9 वर्षापर्यंत आणि 80 वर्षाच्या व्यक्तीने केले तर साडेतीन वर्षापर्यंत आयुष्य वाढू शकत.” म्हणून डायट करण्याचे कोणतेही वय नाही.
  • अगदी 13-14 वर्षाच्या मुलांनी जरी जेवणात चांगल्या पद्धती अवलंबल्या तरीही त्यांच्या वाढत्या शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, डाएटरी फॅट्स हे योग्य प्रकारे मिळून एक सुदृढ आणि आरोग्यपूर्ण शरीर घडवायला मदत होईल. आणि अगदी 60 ते 80 वर्षांच्या व्यक्तिंच्याही जेवणामध्ये अशा थोड्या थोड्या सुधारणा केल्या तर त्यांच उर्वरित आयुष्य सुकर होईल.

रेश्मा जाधव दोरके

नुट्रिशनीस्ट, फिटनेस कोच 

[email protected]


हेही वाचा :

डाएट म्हणजे काय?

- Advertisment -

Manini