घरमहाराष्ट्रEknath Shinde : "एक दिवस तुम्ही कचऱ्यात जाणार..." शिंदेंचा ठाकरेंवर घणाघाती हल्ला

Eknath Shinde : “एक दिवस तुम्ही कचऱ्यात जाणार…” शिंदेंचा ठाकरेंवर घणाघाती हल्ला

Subscribe

कोल्हापुरात सुरू असलेल्या शिवसेना पक्षाच्या महाअधिवेशनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे दोन दिवसांचे महाअधिवेशन हे कोल्हापुरात आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाचा आज (ता. 17 फेब्रुवारी) दुसरा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उपस्थितांना संबोधित केले. महाअधिवेशनात भाषण करताना शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे गटाची साथ सोडणाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. पण एक दिवस सोडून जाणारे हेच कार्यकर्ते आणि हा महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तुम्ही दोघेच राहाल, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (CM Eknath Shinde criticizes Thackeray at Shiv Sena convention in Kolhapur)

हेही वाचा… Congress: काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप? मध्य प्रदेशातही काँग्रेसला धक्का; बड्या नेत्याच्या मुलाने बदललं प्रोफाईल

- Advertisement -

कोल्हापुरातील महाअधिवेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या करवीर भूमीत आपले महाअधिवेशन होत आहे. महाअधिवेशनामुळे कोल्हापुरात भगवे वादळ आले आहे. शिवसेनेचे शक्तीपीठ अवतरले आहे. बाळासाहेब देखील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करायचे, आपणही त्याचे पालन केले. बाळासाहेब आणि कोल्हापूरचे अतूट नाते आहे. तुमच्यामुळे शिवसेना ताकदीने उभी राहिली आहे. आज समाधान आहे की, आपला शिवसेना पक्ष पुढे जात आहे, मोठा होत आहे. आपली शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे, ही जमेची बाजू आहे. सत्याचा नेहमी विजय होत असतो, त्यामुळे हे आज आपल्याकडे आहे.

येथे जमलेल्या गर्दीमुळे शिवसेना कोणाची आहे? हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. या अधिवेशनात अनेक ठराव घेतले. अभिनंदनाचे, शेतकऱ्यांचे ठराव घेतले. बाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. त्यासाठी आपण त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. सहकार क्षेत्रातील कामामुळे अमित शहा यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. 370 कलम हटवणे हेही बाळासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न मोदी आणि शहा यांच्यामुळे पूर्ण झाले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले.

- Advertisement -

आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम 370 हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही. तुमच्याकडे एखादी व्यक्ती जोपर्यंत असते, तोपर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दार होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र आणि गेलेले कार्यकर्ते तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, असा घाणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. आज त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, हे त्यांना आपण सांगायची गरज नाही, तर त्यांना हे कळले पाहिजे, असा सल्ला शिंदेनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -