Saturday, April 27, 2024
घरमानिनीलग्नानंतर पायात जोडवी का घालतात? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

लग्नानंतर पायात जोडवी का घालतात? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Subscribe

हिंदू धर्मामध्ये स्त्रियांच्या प्रत्येक अलंकाराचे एक विशेष महत्व आहे. पुरातन काळापासून लग्नानंतर महिलांसाठी मंगळसूत्र, बांगड्या आणि पायातील जोडवी यांचे खूप महत्व सांगितले जाते. लग्नानंतर महिला त्यांच्या पायात जोडवी घालतात. असं म्हणतात की, पायामध्ये जोडवी घालण्यामागे अनेक धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व आहे. खरंतर पायातील जोडव्याला स्त्रियांच्या 16 श्रृंगारापैकी एक मानलं जातं.

जोडवी घालण्यामाचे धार्मिक महत्व
असं म्हणतात की, पुरातन काळापासून लग्न झालेल्या सुवासिनी महिला ज्या प्रकारे मंगळसूत्र घालतात. तसेच जोडवी देखील घालतात. जोडवी महिलांना आपल्या पतीशी जोडून ठेवतात. तसेच विवाहित महिलांच्या 16 श्रृंगारामध्ये देखील जोडवी असतात.

- Advertisement -

जोडवी घालण्यामाचे वैज्ञानिक महत्व


महिलांच्या पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये जोडवी घातली जातात. वैज्ञानिकदृष्ट्या या पायाची शिर सरळ गर्भाशयाशी जोडलेली असते. अशावेळी जेव्हा या पायांवर जोडवीचा दाब पडतो तेव्हा शिर देखील दबते. ज्यामुळे शिरांमध्ये रक्ताचा संचार सुरळीत होतो. या जोडव्या एक्यूप्रेशरचं काम करतात. यामुळे महिलांचे ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहते. तसेच यामुळे मासिक पाळीसंबंधित कोणतीही समस्या निर्माण होत नाही. ज्या माहिलांची मासिक पाळी अनियंत्रीत असते. त्यांनी जोडवी नक्की घालायला हवी.

- Advertisement -

पायामध्ये चांदीच्या जोडव्या का घालतात?


तुम्ही पाहिलं असेल महिला पायामध्ये नेहमी चांदीच्या जोडवी घालतात. सोन्याची किंवा इतर कोणत्याच धातूची जोडवी महिला घालत नाहीत. खरंतर सोन्याला देवी लक्ष्मी स्वरूप मानले जाते. त्यामुळे कधीही कंबरेच्या खालच्या भागात सोन्याचे दागिने घातले जात नाहीत. कारण यामुळे यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होत असल्याचं म्हटलं जातं. तसेच चांदी जमीनीचील ऊर्जा शोषून घेते आणि आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते.


हेही वाचा  :

औषधं न घेताही पाळी पुढे ढकलण्याचे नैसर्गिक उपाय

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -

Manini